सातारा- अवैध सावकारी करून पिळवणूक केल्या प्रकरणी औंध पोलीस ठाण्यात 12 जनांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात आठ दिवसात तीन पोलीस ठाण्यात असे गुन्हे दाखल झाले आहेत.
हेही वाचा- घाऊक बाजारपेठेतील महागाईत वाढ; जानेवारीत ३.१ टक्क्यांची नोंद
विक्रांत भंडारे यांनी 2015 ला किरण लोहारा यांच्याकडून व्यवसायासाठी 3 टक्के व्याजदराने दोन लाख रुपये घेतले होते. दरम्यान, किरण लोहाराने टक्केवारी वाढवत 10 टक्क्यांने व्याज मागायला सुरुवात केली. विक्रांत भंडारे यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी काही महिन्यातच मुद्दल व व्याज परत केले.
मात्र, किरण लोहारा आणि त्यांच्या काही साथीदाराने भंडारे यांच्या दुकानात जाऊन 3 लाख 50 हजारांची मागणी करत विक्रांत यांना शिवीगाळ, दमदाटी, केली. या त्रासाला कंटाळून विक्रांत भंडारे यांनी किरण नारायण लोहारा, संजय किसन जाधव, संदीप ऊर्फ सचिन उत्तम कदम, सतीश रामचंद्र जाधव, अरुण लवळे, पोपट गोसावी, सचिन पोपट गोसावी, अक्षय त्रिंबके, साहिल बागवान, अकबर मुल्ला, संदीप कुंदप (सर्व राहणार पुसेसावळी ता. खटाव) व दत्तात्रय सदाशिव पिसाळ (रा.बोरगाव ता. तासगाव जि. सांगली) यांच्या विरूद्ध तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलीस निरिक्षक भापकर करीत आहेत.