ETV Bharat / state

Two Robbers Recaptured : औंध पोलिसांचे लाॅकअप फोडून पळालेले ५ पैकी दोन दरोडेखोर पुन्हा ताब्यात - पाच अट्टल दरोडेखोर

औंध पोलीस (Aundh police ) ठाण्याचे लॉकअप फोडून (breaking the lockup) आज पहाटे पळालेल्या पाच अट्टल दरोडेखोरांपैकी ( five robbers) दोघांना पोलिसांनी पुन्हा जेरबंद (Two robbers recaptured) केले आहे. या खळबळजनक घटनेमुळे औंध परिसरात मोठा पोलिस फाटा वाढविला आहे. या भागाला पोलिस छावणीचे स्वरुप आले आहे.

Aundh Police
औंध पोलिस
author img

By

Published : May 9, 2022, 10:03 PM IST

सातारा: आरोपी पलायनाची घटना सोमवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास घडली. त्यानंतर पोलिसांनी औंध परिसर पिंजून काढून त्यातील दोघांना पुन्हा जेरबंद केले. राहूल भोसले आणि सचिन भोसले अशी दोघांची नावे आहेत. तर अजय भोसले, राहुल ऊर्फ होमराज उध्दव काळे व अवी सुभाष भोसले हे तिघेजण फरार झाले आहेत. पुसेसावळी येथे ११ जानेवारी रोजी दरोडा पडला होता. याप्रकरणातील हे पाच जण संशयित आहेत.

अजय सुभाष भोसले (वय २२, रा. माही जळगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर), सचिन सुभाष भोसले (२३, रा. माही जळगाव, ता. कर्जत), राहुल पदू भोसले (२८, रा. वाजुळ, पारगाव, जि. अहमदनगर), राहुल ऊर्फ होमराज उध्दव काळे (२६, रा. वाकी, ता. आष्टी, जि. बीड) व अवी सुभाष भोसले (२२, रा. माही जळगाव, ता. कर्जत) यांना औंध पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पाचही संशयितांना तीन दिवस पोलीस कोठडी मिळाली होती.

दरोडेखोरांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पथकातील हवालदारास एकाने पाणी मागितले. ते पाणी आणण्यासाठी गेले असता, पाचही आरोपींनी ताकद लावून दरवाजाचे लाॅक तोडून पळ काढला. पाचपैकी एक पोलीस ठाण्याच्या पुढील दरवाजातून, तर अन्य चार मागील दरवाजातून पळून गेले. यावेळी काही पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरले.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील जिल्हा दौऱ्यावर असताना ही घटना घडल्याने कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजित बोराडे यांच्यासह पोलीस कर्मचारी औंध येथे तळ ठोकून होते. उर्वरित दरोडेखोरांना पकडण्यासाठी औंधसह परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. सुमारे दोनशेहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.