सातारा (कराड) - दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये कराड तालुक्यातील दोघांचा कोयना नदीत बुडून मृत्यू झाला आहे. हैबुद्दीन काका शेख (वय ४०) आणि अक्षय हणमंत पाटील (वय २५), अशी त्यांची नावे आहेत. या घटनांची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.
माहेरी असलेल्या पत्नीला गेला होता आणायला
मृत हैबुद्दीन शेख हा नारायणवाडी (ता. कराड) येथील रहिवाशी आहे. त्याची पत्नी यास्मिन ही तीन महिन्यांपासून कराडच्या शनिवार पेठेतील दरवेशी वस्तीत माहेरी राहत होती. पत्नीला आणण्यासाठी जात असल्याचे सांगून तो मंगळवारी (दि. १) घरातून गेला होता. तेव्हापासून तो बेपत्ता होता. (Koyna river in Karad taluka) तो बेपत्ता असल्याची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली होती. (Two drowned in Koyna river) गुरूवारी सकाळी कराड येथील जुन्या कोयना नदीवरील जुन्या पुलाखाली नदीपात्रात त्याचा मृतदेह आढळला. हैबुद्दीनचा चुलत भाऊ सिकंदर शेख याने मृतदेह पाहून तो हैबुद्दीनचाच असल्याची ओळख पटली. या घटनेची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
पाणी योजनेचे काम करताना पाण्यात पडला
कुसूर (ता. कराड) येथील अक्षय हणमंत पाटील या २५ वर्षीय तरूणाचा चचेगाव (ता. कराड) येथे कोयना नदीपात्रात मृतदेह आढळला. पाणी योजनेचे काम करत असताना पाय घसरून तो बुधवारी (दि. ३) नदीपात्रात पडला होता. घटनेनंतर नदीपात्रात शोध सुरू करण्यात आला. परंतु, अंधार पडल्यामुळे शोधमोहिम थांबविण्यात आली होती. गुरूवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला. दोन्ही घटनांची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.
हेही वाचा - भीषण स्फोटात 3 मजली इमारत जमीनदोस्त, 8 जणांचा मृत्यू, अनेक ठिगाऱ्याखाली अडकले