ETV Bharat / state

साताऱ्यात घुबड आणि मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणाऱ्या तरुणाला अटक - trafficking of owls and mandul

सातारा शहरात वन्यजीव‍‍‍ांची तस्करी करणाऱ्या संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्याच्याकडून 10 लाख किंमतीचे घुबड आणि मांडूळ जातीचा साप हस्तगत करण्यात आला आहे.

सातारा मांडूळ घुबड तस्करी
सातारा मांडूळ घुबड तस्करी
author img

By

Published : Feb 6, 2020, 2:35 AM IST

सातारा - शहरात कृष्णानगर येथे जलसंपदा कार्यालयासमोर वन्यजीव‍‍‍ांची तस्करी करणाऱ्या संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून पोलिसांनी घुबड व मांडूळ हस्तगत केले. या वन्यजीवांची किंमत १० लाख रुपये इतकी असल्याचे सांगितले जात आहे. अनिकेत शंकर यादव (२१ रा. कृष्णानगर वसाहत, सातारा) असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

साताऱ्यात घुबड आणि मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणाऱ्या तरुणाला अटक

हेही वाचा... मध्य प्रदेश : मुले चोरीच्या संशयावरून सहा शेतकऱ्यांना मारहाण, एकाचा मृत्यू

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जहाड व त्यांच्या पथकाला सातारा-कोरेगाव रस्त्यावर एक युवक संशयास्पदरित्या हातात पिशवी घेऊन उभा असलेला दिसला. अधिक चौकशी केल्यानंतर तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याच्या जवळ असलेल्या पिशवीमध्ये मांडूळ (तपकिरी रंगाचा सर्प) व घुबड आढळले.

हेही वाचा... मलबार हिल येथील लॅसपालमास इमारतीला आग; आठ जणांची सुखरुप सुटका

या युवकाची पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्याने काळ्या बाजारात या वन्यजीवांची चांगली किंमत येते म्हणून विक्रीसाठी पकडले असल्याची कबुली दिली. या दोन्ही जीवांसाठी १० लाख रुपये किंमत असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी मांडुळ व घुबड पक्षी वनविभागाच्या ताब्यात दिले आहे. तसेच युवकावर वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

Intro:सातारा : कृष्णानगर येथे जलसंपदा कार्यालयाच्या गेटसमोर घुबड व मांडूळ या वन्यजिव‍‍‍ांची तस्करी करणा-य‍ा संशयितास ताब्यात घेऊन पोलिसांनी दोन्ही प्राणी हस्तगत केले. काळ्या बाजारात या जिवांची किंमत १० लाख रुपये इतकी सांगितली जाते.Body:अनिकेत शंकर यादव (वय २१ रा. कृष्णानगर वसाहत सातारा) असे संशयिताचे नाव आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पोलिस उपनिरीक्षक प्रसन्न जहाड व त्यांच्या पथकाला सातारा - कोरेगाव रस्त्यावर एक युवक संशयास्पदरित्या हातात पिशवी घेऊन उभा असलेला दिसला. अधिक चौकशी केल्यानंतर पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्य‍ा झडतीत पिशवीमध्ये मांडूळ (तपकिरी रंगाचा सर्प) व घुबड सापडले.

काळ्या बाजारात चांगली किंमत येते म्हणून विक्री करण्याकरीता पकडले असल्याची त्याने कबुली दिली. या दोन्हीपोटी १० लाख रुपये किंमत सांगितली जाते.

मांडुळ व घुबड पक्षी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. वनाधिका-यांनी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या
मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रसन्न जहाड, हवालदार तानाजी माने, संतोष पवार, मुबीन मुलाणी, विजय कांबळे, शरद बेबले, नितीन गोगावले, प्रविण फडतरे, प्रमोद सायंत, मुनीर मुल्ला, अजित कर्णे, निलेश काटकर, विशाल पवार, विक्रम पिसाळ, संजय जाधव, विजय सावंत यांनी ही कारवाई यशस्वी केली.

vdo कॅप्शन
कारवाईची माहिती देताना पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटीलConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.