ETV Bharat / state

राज्यातील धरणे भरली; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - महाराष्ट्रातील मोठी धरण

मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे राज्यातील धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यामुळे अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

धरणे
धरणे
author img

By

Published : Aug 18, 2020, 8:18 PM IST

सातारा - मागील ५ दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे १०४ टीएमसी क्षमता असलेल्या कोयना धरणात आतापर्यंत ९२.८१ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. धरणात प्रतिसेकंद 1 लाख 14 हजार 980 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. यामुळे जलपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी 10 फुटावर उचलण्यात आलेले धरणाचे सहा वक्राकार दरवाजे अजूनही उघडे ठेवण्यात आले आहेत. पुढील २४ तासात पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास दरवाजे आणखी उचलून पाण्याचा विसर्ग करण्यात येईल, अशी माहिती माहिती कोयना जलसिंचन विभागाकडून देण्यात आली.

मात्र, यामुळे कोयना नदी दुधडी भरून वाहत असून नदीवरील मेंढेघर, नेरळे, जुना संगमनगर धक्का पूल, मूळगाव आणि निसरे फरशी पूल पाण्याखाली गेले आहेत. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोल्हापूर - राधानगरी धरणाची एकूण पाणी साठविण्याची क्षमता ८.३६ टीएमसी म्हणजेच 236.79 दलघमी एवढी आहे. सोमवारी सकाळपर्यंत धरणात ८.२४ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. यामुळे धरणाच्या ७ स्वयंचलीत दरवाजांपैकी 2 दरवाजांमधून विसर्ग सुरू आहे. सध्या धरणातून ४ हजार २५६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असला तरी पावसाच जोर वाढल्यास हा विसर्ग आणखीन वाढण्याची शक्यता आहे. असे झाल्यास आधीच धोक्याच्या पातळीवर पोहचली पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवर पोहचून पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

भंडारा - वैनगंगा नदी, नागपूरची नाग नदी आणि मध्येप्रदेशातील संजय सरोवरातून होणाऱ्या पाण्याच्या आवकमुळे जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणात 1146.08 दलघमी पाणीसाठा जमा झाला आहे. पाण्याची आवक कायम असल्याने धरणाचे १५ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहेत. यामुळे १ हजार ६६३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पाण्याचा विसर्ग असाच कायम राहिल्यास गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असेल.

अमरावती - जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरण विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी महत्वपुर्ण धरण आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणी पातळी ३४२.१४ मीटर वर पोहचली आहे. तर धरणात एकूण ५३१.४३ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. या पाणीसाठ्यासह धरण ९४.२२% भरल्याने धरणातून ३ दरवाज्यांतून ४८ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

नाशिक - देशातील पहिले मातीचे धरण असलेल्या गंगापूर धरणात 83 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मागील ४ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आठवड्यापुर्वी ४५ टक्के पाणीसाठा असलेल्या धरणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याच धरणातून नाशिक जिल्ह्याला पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांसमोरील पाणी कपातीचे संकट टळले आहे.

हिंगोली- जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरणामध्ये पाणी पातळी 100 टक्क्यांवर पोहचली आहे. धरणात होणारी आवक कायम असल्याने धरणाचे १४ दरवाजे उघडण्यात आले आहेत. यातून ५८ हजार २४० क्सुसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. यामुळे पूर्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे हिंगोली प्रशासनाच्या वतीने पूर्णा नदी लगत असलेल्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, नदी लगत असलेल्या शेत शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. तर अनेक शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान देखील झाले आहे.

ठाणे - जिल्ह्यात सरासरी जेमतेम १६.७ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली असली तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस होत आहे. आंध्रा व मध्य वैतरणा धरणात सर्वाधिक पाऊस पडला. तर मोडक सागर धरण ९४ टक्के आणि बारवी धरण ७३ टक्के भरले आहे. सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊन पाणीकपात लागू करण्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून धरणांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे पाणीसाठा वाढला आहे. साहजिकच पाणीकपातीची चिंता आता दूर झाली आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी ठाणे, मुंबईला पाणीपुरवठा करणारे बारवी, आंध्रा, मोडकसागर धरण १०० टक्के भरले होते. पण आता बारवीत ७२.८३ टक्के पाणी साठा झाला आहे. आज बारवी धरणाच्या परिसरात केवळ १० मि.मी. पाऊस पडला. मात्र, या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडला. यामध्ये खानिवरे ६० मि.मी., कान्होळ २७ मि.मी., पाटगाव आणि ठाकूरवाडीला आठ मि.मी. पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणीसंकट टळले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.