ETV Bharat / state

अभिजित बिचुकलेंचे नाव नोंदणीच नसल्याचा प्रशासनाकडून खुलासा

शिक्षक व पदवीधर निवडणुकीतील अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले यांच्या तक्रारीची पडताळणी केली असता त्यांनी या कार्यालयास शिक्षक व पदवीधर मतदार नोंदणीसाठी अर्ज दाखल केला नव्हता, असे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याचा खुलासा सहायक निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केला आहे.

author img

By

Published : Dec 1, 2020, 9:00 PM IST

जिल्हाधिकारी शेखर सिंह
जिल्हाधिकारी शेखर सिंह

सातारा - शिक्षक व पदवीधर निवडणुकीतील उमेदवार अभिजित बिचुकले यांच्या तक्रारीची पडताळणी केली असता त्यांनी या कार्यालयास शिक्षक व पदवीधर मतदार नोंदणीसाठी अर्ज दाखल केला नव्हता, असे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याचा खुलासा सहायक निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केला आहे.

काही तासातच जिल्हाधिकाऱ्यांचा खुलासा

मंगळवारी (दि. 1 डिसेंबर) विविध प्रसारमाध्यमांना पदवीधर तसेच शिक्षक मतदार संघातील अपक्ष उमेदवार अभिजित बिचुकले यांनी दिलेल्या मुलाखतीत 'माझे नाव मतदार यादीतून गायब करुन भोंगळ कारभाराचे दर्शन घडले आहे', असा आरोप केला होता. त्यानंतर काही तासातच जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत खुलासा केला आहे.

मतदार यादीवर हरकत नाही

जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिक्षक व पदवीधर मतदार संघाची प्रारुप मतदार यादी 23 नाव्हेंबर, 2019 रोजी व अंतिम मतदार यादी 30 डिसेंबर, 2019 रोजी प्रसिद्धी करण्यात आलेली आहे. तसेच पुरवणी क्र.1 पुरवणी क्र.2 व पुरवणी क्र.3 मुळ यादीसह मतदार यादी निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या प्रसिद्धी कार्यक्रमानुसार प्रसिद्धी करण्यात आलेली आहे. मतदार याद्यांची प्रसिद्धी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रसिद्धी करण्यात आलेली असून मतदार यादीवर हरकत घेण्याचा कालावधीत अभिजीत वामनराव आवाडे-बिचुकले यांनी कोणत्याही प्रकारची हरकत दाखल केलेली नसल्याचे दिसून येत आहे.

तक्रारीत तथ्य नाही

यादी ही कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून तसेच मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयाच्या संकेतस्थळावरही सर्व मतदारांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे. मात्र, मतदानाच्या दिवसापर्यंत अभिजीत वामनराव आवाडे-बिचुकले यांनी मतदार यादीत त्यांचे नाव नसल्याबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार केलेली नाही. पण, उमेदवाराचे नाव राज्य विधानसभेच्या मतदार यादीत असणे अनिवार्य आहे. त्यांच्या तक्रारीमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचेही सहायक निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह प्रसिद्धी पत्रकार म्हटले आहे.

हेही वाचा - मतदार यादीतून उमेदवार अभिजित बिचुकलेंचे नाव गायब

हेही वाचा - पुणे पदवीधर निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण मतदानापासून वंचित; सदोष यादीचा फटका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.