सातारा - कराड-पाटण तालुका शिक्षक सोसायटीच्या निवडणूक ( Karad Patan Taluka Teachers Society Election ) प्रचाराचा शुभारंभ ( Teacher campaign meeting ) चक्क प्रीतिसंगम उद्यानात ( Prithisangam park ) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी ( Yashwantrao Chavan Samadhi ) अभिवादन केल्यानंतर उद्यानात सतरंज्या अंथरूण प्रचार शुभारंभाची सभा देखील घेण्यात आली. प्रीतिसंगम उद्यानात राजकीय कार्यक्रमांना मनाई असताना ( Prithisangam park during ban ) हा प्रकार घडला आहे. त्यामुळे नगरपालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच यशवंतप्रेमींमध्ये तीव्र संताप आहे.
![Teacher campaign meeting](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-str-3-campaignmeetingwasheldinpreethisangamudyanwhileitwasprohibitedyashwant-lovingcitizenswereangry-10054_28122022210341_2812f_1672241621_318.jpg)
सुशिक्षित शिक्षकांचा अडाणीपणा - मोठी आर्थिक उलाढाल असणाऱ्या कराड-पाटण शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीसाठी दोन पॅनेलमध्ये लढत होत आहे. गुरूजन एकता पॅनेलमध्ये शिक्षकांच्या दहा संघटना एकवटल्या आहेत. या पॅनेलने ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर प्रीतिसंगम उद्यानातच सभा घेतली. वास्तविक उद्यानात राजकीय अथवा सार्वजनिक कार्यक्रमांना मनाई आहे. ही बाब सर्वश्रुत आहे. तरीही सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या शिक्षकांनी आगळीक करून अडाणीपणाचे दर्शन घडवले. प्रीतिसंगमाचा राजकीय आखाडा केल्याने यशवंतप्रेमी संतप्त झाले असून शिक्षकांची प्रचार सभा वादात सापडली आहे.
![Yashwantrao Chavan Samadhi](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-str-3-campaignmeetingwasheldinpreethisangamudyanwhileitwasprohibitedyashwant-lovingcitizenswereangry-10054_28122022210341_2812f_1672241621_538.jpg)
नगरपालिका प्रशासन अनभिज्ञ - शिक्षक सोसायटी निवडणुकीच्या प्रचार शुभारंभाची सभा प्रीतिसंगम उद्यानात झाल्याची नगरपालिका प्रशासनाला खबरच नाही. वास्तविक उद्यानात दिवस-रात्र नगरपालिकेचे सुरक्षा रक्षक असतात. तरीही राजकीय सभा झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. उद्यानातील प्रचार सभेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊनही नगरपालिका अनभिज्ञ होती.
![Prithisangam park](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-str-3-campaignmeetingwasheldinpreethisangamudyanwhileitwasprohibitedyashwant-lovingcitizenswereangry-10054_28122022210341_2812f_1672241621_237.jpg)
पालिका प्रशासनाची उडाली धावपळ - या घटनेची माहिती घेण्यासाठी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याशी संपर्क साधला असता ते मुंबईत होते. त्यामुळे उप मुख्याधिकारी पल्लवी पवार यांनी माहिती घ्यायला सुरूवात केली. हा प्रकार नगरपालिका प्रशासनाच्या चांगलाच अंगलट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सभा घेणाऱ्या शिक्षकांवर पालिका प्रशासन काय कारवाई करणार, याकडे कराडकर आणि यशवंतप्रेमींचे लक्ष लागून आहे.