कराड (सातारा) - स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्या तांबवे (ता. कराड) येथील ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव घेतला आहे. मासिक सभेत उपसरपंच अॅड. विजयसिंह पाटील यांनी ठराव मांडला. त्यावर चर्चा होऊन ग्रामपंचायत सदस्या जयश्री कबाडे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर एकमताने हा ठराव मंजूर झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाडनंतर तांबवे ग्रामपंचायतीने घेतलेला हा सातारा जिल्ह्यातील पहिला ठराव आहे.
ठरावानुसार अंमलबजावणीही आवश्यक - कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने घेतलेल्या विधवा प्रथा बंदीच्या ठरावाबद्दल हेरवाड ग्रामपंचायतीच्या अभिनंदनाचाही ठराव तांबवे ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत घेण्यात आला आहे. तांबवे गावाला स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी म्हटले जाते. स्वातंत्र्य चळवळीत या गावातील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपले योगदान दिले होते. विधवा प्रथा बंदीचा कौतुकास्पद निर्णय घेतल्यानंतर आता त्याची ठरावाची अंमलबजावणी करणे देखील तितकेच आवश्यक आहे. तरच ठरावाचे फलित होईल.
विधवा महिलांना सन्मानाने जगण्याचा अधिकार - घटनेने सर्वांना समान अधिकार दिले आहेत. त्यानुसार विधवा महिलांना देखील समाजात सन्मानाने जगता आले पाहिजे. म्हणून ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंदीचा ठराव घेतला आहे. या ठरावामुळे विधवा महिलांना सन्मानाने जगता येईल. त्याचे हक्क, अधिकारी अबाधित राहतील, अशी प्रतिक्रिया उपसरपंच अॅड. विजयसिंह पाटील यांनी दिली.
कराड तालुक्यातील तांबवे ग्रामपंचायतीने घेतला विधवा प्रथा बंदीचा ठराव - कराड तालुका तांबवे ग्रामपंचायत बातमी
घटनेने सर्वांना समान अधिकार दिले आहेत. त्यानुसार विधवा महिलांना देखील समाजात सन्मानाने जगता आले पाहिजे. म्हणून ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंदीचा ठराव घेतला आहे. या ठरावामुळे विधवा महिलांना सन्मानाने जगता येईल. त्याचे हक्क, अधिकारी अबाधित राहतील, अशी प्रतिक्रिया उपसरपंच अॅड. विजयसिंह पाटील यांनी दिली.