ETV Bharat / state

Chhatrapati Shivaji Maharaj : शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; राज्यपालांसह दानवेंचा जाळला प्रतिकात्मक पुतळा - Singular mention of Shivaji Maharaj

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ( Minister of State for Central Railway ) रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve ) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj ) एकेरी उल्लेख केल्याने साताऱ्यातील शिवतीर्थावर यांचे प्रतीकात्मक पुतळे जाळण्यात आले. ( Symbolic effigies were burned )

Burnt symbolic statue of demons
प्रतीकात्मक पुतळे जाळण्यात आले
author img

By

Published : Dec 5, 2022, 6:42 AM IST

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याच्या निषेधार्थ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) आणि केंद्रीय मंत्री ( Minister of State for Central Railway ) रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve ) यांचे प्रतिकात्मक पुतळे खासदार उदयनराजे (MP Udayanaraje ) समर्थकांनी साताऱ्यातील पोवई नाक्यावर जाळले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांचा ( Chhatrapati Shivaji Maharaj) एकेरी उल्लेख ( Single mention of Chhatrapati Shivaji Maharaj ) केल्याने छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी सातारा येथील शिवतीर्थावर राज्यपाल व रावसाहेब दानवे यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला.

अदखलपात्र गुन्ह्याची नोंद : पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून खासदार उदयनराजे भोसले समर्थकांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यानंतर त्यांचे पुतळे जाळले. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

आंदोलक पोलिसांमध्ये झटापट : पुतळ्याचे दहन करताना उदयनराजे समर्थक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्यामुळे खासदार उदयनराजे भोसले समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्याचेच पडसाद साताऱ्यातील पोवई नाक्यावर पाहायला मिळाले.

काय म्हणाले होते रावसाहेब दानवे : रावसाहेब दानवे म्हणाले होते की, आमच्या माहितीप्रमाणे समर्थ रामदासच शिवरायांचे गुरु होते. जेवढे आम्ही शिकलो, जेवढे आम्ही वाचले, जेवढे ऐकले त्याचा आधार घेऊन बोलतोय. आमच्यापेक्षा अधिक वाचणारे कुणी असेल किंवा त्यांच्या वडिलांना, जाणकारांना आमच्यापेक्षा जास्त माहिती असेल तर तो त्यांचा भाग आहे. पण आमची माहिती अशीच आहे की, रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरू होते, असे वक्तव्य दानवेंनी केले होते.

काय म्हणाले राज्यपाल : दरम्यान, राज्यपाल सातत्याने अशी विधाने करत असल्याने राज्यात सर्वदुर संतापाची लाट उसळली आहे. राजकीय क्षेत्रातुन राज्यपालांवर सडकुन टिका केली जात आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील आदर्श असल्याचे विधान राज्यपाल यांनी केल आहे. यावरून राज्यात मोठा वादंग निर्माण झालेला आहे. राज्यपाल आणि भाजप नेत्यांकडून वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बेताल वक्तव्यं केली जात आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.