ETV Bharat / state

Sharad Pawar : महापुरुषांच्या अवमानाबद्दल उदयनराजेंची भूमिका योग्य; केंद्र-राज्य सरकार बघ्याच्या भुमिकेत - शरद पवार - Sharad Pawar Statement On Udayanraje

महापुरुषांच्या अवमानाबद्दल उदयनराजेंनी भूमिका योग्य असल्याचे शरद पवार यांनी म्हटले ( Udayanaraje Stand Against Disrespect Great Man ) आहे. केंद्र सरकारला आज ना उद्या निर्णय घ्यावा लागेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. ते कराडमध्ये बोलत होते.

Sharad Pawar Udayanaraje
शरद पवार उदयनराजे
author img

By

Published : Dec 17, 2022, 12:17 PM IST

सातारा : महापुरुषांच्या अवमानाबद्दल उदयनराजेंनी घेतलेली भूमिका योग्य ( Udayanaraje Stand Against Disrespect Great Man ) आहे. मात्र, राज्य आणि केंद्र सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कराडमध्ये माध्यमांशी बोलताना ( Sharad Pawar Statement On Udayanraje ) दिली.

मोर्चाला परवानगी मिळण्यात आश्चर्य काय? : महाविकास आघाडीच्या मोर्चाच्या परवानगीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितले आहे की लोकशाहीमध्ये मोर्चा, आंदोलनाचा अधिकार आहे. त्याचा योग्य तो निर्णय होईल. त्यामुळे मोर्चाला परवानगी मिळाली, यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

अवमानकारक वक्तव्ये अस्वस्थ करणारी : महापुरुषांच्या वक्तव्याबद्दल लोकांमध्ये राग आहे. विशेषता छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत जबाबदार व्यक्तींनी केलेली विधाने सामान्यांना अस्वस्थ करणारी ( State and Central Government Just Watchers ) आहेत. त्याची प्रतिक्रिया भविष्यात दिसेल, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.

राज्यपालांबाबत केंद्राला निर्णय घ्यावा लागेल : कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्वतःची संस्था चालवताना मुलांना दोन वेळचे अन्न नसल्याने स्वतःच्या पत्नीचे दागिने विकून मुलांना शिकवले. ते भिक मागत नव्हते. महापुरुषांचे एवढे मोठे योगदान असूनही त्यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केली जात आहेत. बोलताना राज्यकर्त्यांना तारतम्य राहिलेले नाही, अशी टीका शरद पवारांनी चंद्रकांत पाटलांचा नामाोल्लेख टाळून केली. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावर केंद्राला आज ना उद्या निर्णय घ्यावा लागेल, असेही पवार म्हणाले.

For All Latest Updates

TAGGED:

Sharad Pawar
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.