ETV Bharat / state

शिखर शिंगणापूर येथे शंभू महादेवाची यात्रा उत्साहात, भाविकांना दुष्काळाच्या झळा

६ वाजण्याचा दरम्यान भुतोजीबुवा तेली यांची मानाची कावड मुंगी घाटातून मानवी साखळीच्या साहाय्याने वरती गेली. यात्रेला भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

शंभू-महादेव शिखर शिंगणापूर यात्रा
author img

By

Published : Apr 17, 2019, 12:38 PM IST

सातारा - शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव यात्रेत 'शंभू महादेव, हर हर महादेव' अशा जयघोषात मुंगी घाट दुमदुमून गेला. ६ वाजण्याचा दरम्यान भुतोजीबुवा तेली यांची मानाची कावड मुंगी घाटातून मानवी साखळीच्या साहाय्याने वरती गेली. कावडवर आल्यानंतर शंभू महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करण्यात आला. यात्रेला भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

शंभू-महादेव शिखर शिंगणापूर यात्रा

शिखर शिंगणापूर येथे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या खासगी मालकीच्या देवस्थानात ३ दिवस यात्रा चालू आहे. दुसऱ्या दिवशी इंदोरचा राजा कालगावडे यांनी मंदिरात येऊन दर्शन घेतले. यात्रेच्या निमित्ताने सर्व भक्तांना श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

यावर्षी भाविकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. शिंगणापूर यात्रेत दुष्काळी परिस्थितीची जाणीव होत होती. तर, लोकसभा निवडणुकीचा हंगाम असल्याने भाविक यात्रेकरुंकडे प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले. प्रशासकीय यंत्रणेने काही प्रमाणात सोयीसुविधा दिल्या नसल्याने नागरिक व भावी भक्तांमध्ये नाराजी दिसून येत होती. पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवत यात्रा पार पाडली.

Intro:सातारा शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव यात्रेत "शंभू महादेव, हर हर महादेव" अशा जयघोषात मुंगी घाट दुमदुमून गेला. सहा ते साडे सातच्या दरम्यान भुतोजीबुवा तेली यांची मानाची कावड मुंगी घाटातून मानवी साखळी करून या घाटातून कावड वरती घेतली गेली. वरती आल्यानंतर शंभू महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करण्यात आला. यात्रा अलोट गर्दी संपन्न झाली

Body:श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या खाजगी मालकीचे असलेले देवस्थान शिखर शिंगणापूर, या ठिकाणी तीन दिवस चालू आहे. आज दुसऱ्या दिवशी इंदोरचा राजा कालगावडे यांनी मंदिरात येऊन दर्शन घेतले. तसेच सर्व भक्तांना श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

शिंगणापूर यात्रेत दुष्काळी परिस्थितीची सावट जाणवत होते. त्यामुळे यावर्षी भाविकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. तर लोकसभा निवडणुकीचा हंगाम असल्याने भाविक यात्रेकरूंच्या प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले. प्रशासकीय यंत्रणेने काही प्रमाणात सोयीसुविधा दिल्या नसल्याने नागरिक व भावी भक्तांमध्ये नाराजी दिसून येत होती. पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवून यात्रा उत्साहात पार पाडली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.