सातारा (कराड) - बाल लैंगिक अत्याचाराच्या खटल्यात आरोपीला दोषी धरून २० वर्षे सक्तमजुरी आणि २२ हजार रूपये दंडाची शिक्षा कराड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती के. एस. होरे यांनी आज सुणावली आहे. संजीव बाबुराव चव्हाण (वय ५४, रा. तांबवे, ता. कराड), असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. (20 years hard labor in child sexual case) दरम्यान, दंडाच्या रकमेतील १० हजार रुपये पीडित मुलीला द्यावेत, असेही न्यायालयाने निकालात म्हटले आहे.
अल्पवयीन पीडित मुलीच्या अज्ञाणपणाचा गैरफायदा घेऊन तिच्या ईच्छेविरूद्ध जबरदस्तीने तिचे लैगिंक शोषण केल्याची फिर्याद पीडित मुलीच्या आईने २ ऑगस्ट २०२० रोजी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरून संजीव बाबुराव चव्हाण याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. बाल लैंगिक अत्याचाराचा (पोक्सो) खटला असल्याने तो विशेष न्यायालयात चालविण्यात आला. महिला पोलीस उपनिरीक्षक दीपज्योती पाटील यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.
दंडातील १० हजार रुपये पीडितेला
जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती के. एस. होरे यांच्या कोर्टात खटल्याची सुनावणी सुरू होती. फिर्यादी पक्षातर्फे एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षातर्फे सहाय्यक जिल्हा व विशेष सरकारी वकील राजेंद्र शहा यांनी काम पाहिले. पीडीत मुलगी, तपास अधिकारी, पीडीती मुलीला पाहणाऱ्या साक्षीदारांचे जबाव महत्वपूर्ण ठरले. सरकार पक्षाने सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी आणि २२ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाच्या रकमेतील १० हजार रुपये पीडित मुलीला द्यावी, असेही निकालात म्हटले आहे.
हेही वाचा - ब्लादिमीर पुतीन यांनी उद्योगांची बोलाविली बैठक; विविध देशांच्या निर्बंधांवर करणार चर्चा