सातारा - माण तालुक्यातील दहिवडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षापदाच्या निवडीत शुक्रवारी सतीश जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे.
दहिवडी नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष दिलीपराव जाधव यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. आमदार जयकुमार गोरे यांची सत्ता असलेल्या या नगरपंचायतीत पहिल्या अडीच वर्षासाठी साधना गुंडगे यांना संधी मिळाली होती. त्यानंतर दिलीपराव जाधव यांना नगराध्यक्षपदाची संधी मिळाली. ठरलेल्या कालावधीनंतर त्यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक जाहीर झाली. तर, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सतीश सुभाष जाधव, निलम शिवाजी शिंदे आणि अजित ज्ञानदेव पवार यांनी अर्ज दाखल केले होते.
हेही वाचा - वीर धरणात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह
मात्र, अर्ज माघारी घेण्याच्या कालावधीत नीलम शिंदे व अजित पवार यांनी आपले अर्ज माघारी घेतले. यानंतर, सतीश जाधव यांचाच अर्ज उर्वरित राहिल्यामुळे आज(शुक्रवारी) नगराध्यक्षपादी सतीश जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
हेही वाचा - जयवंत साखर कारखान्याचा वजनकाटा निर्दोष; शासकीय अधिकाऱ्यांनी केली तपासणी