ETV Bharat / state

साताऱ्यात गुलमोहर 'डे' उत्साहात साजरा; अबाल-वृद्धांची गर्दी - satara gulmohar day

लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कलाकार, रसिक व पर्यावरणप्रेमी गुलमोहर 'डे' मध्ये सहभागी झाले होते. दोन सत्रात गुलमोहर 'डे' साजरा करण्यात आला.

सातारा
author img

By

Published : May 2, 2019, 11:18 AM IST

सातारा - गेली १७ वर्षे अव्याहतपणे गुलमोहराचे सौंदर्य साताऱ्यातील लोकांना समजावणारा गुलमोहर 'डे' बुधवारी साताऱ्यात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी साताऱ्यातील अबाल-वृद्धांनी या उत्सवाला आवर्जुन हजेरी लावली.

पर्यावरण विषयक उपक्रम, जनजागृती तसेच ललित कला, साहित्य, संगीत, नृत्य आविष्काराच्या माध्यमातून निसर्ग आणि कला यांचा अनुभव गुलमोहर 'डे' दिवशी अधोरेखित केला जातो. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कलाकार रसिक व पर्यावरण प्रेमी गुलमोहर 'डे' मध्ये सहभागी झाले होते. दोन सत्रात गुलमोहर 'डे' साजरा करण्यात आला. सकाळी चित्रकला मांडण शिल्पाचे प्रात्यक्षिके, मार्गदर्शन तर संध्याकाळच्या सत्रात काव्यवाचन करण्यात आले.

सातारा
गेली सतरा वर्षे साताऱ्यातील पर्यावरण प्रेमी सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ कलावंतांच्या पुढाकाराने हा गुलमोहर 'डे' दरवर्षी १ मे रोजी साजरा केला जातो. यंदाही सातारा दूध संघासमोर असलेल्या मोठ्या गुलमोहराच्या झाडाखाली गुलमोहर 'डे' चे नियोजन करण्यात आले होते. गुलमोहरच्या झाडाखाली ठीक-ठिकाणी चित्रकला मांडण शिल्पाचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. तसेच शालेय विद्यार्थी गुलमोहराच्या झाडाखाली बसून गुलमोहर चित्र रेखाटत होती.
साताऱ्यातील अनेक मान्यवरांनी या ठिकाणी आवर्जुन सहभाग नोंदवला. या कार्यक्रमात अबालवृद्धांचा सहभाग लक्षणीय होता. रखरखत्या उन्हात गुलमोहर बहावा शिरीष या झाडांच्या फुलांची रंगाची उधळण सजग मनांनी टिपावी, निसर्गाच्या रंगउत्सवात रंगून जाताना पर्यावरण भान निर्माण व्हावे, हा उद्देश जपला जावा, यासाठी दरवर्षी साताऱ्यात गुलमोहर 'डे' साजरा केला जातो.

Intro:सातारा गेली सतरा वर्षे अव्याहतपणे गुलमोहराचे सौंदर्य साताऱ्यातील लोकांना समजावणारा गुलमोहर 'डे' आज साताऱ्यात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी साताऱ्यातील आबालवृद्धांनी या उत्सवाला आवर्जून हजेरी लावली.

Body:पर्यावरण विषयक उपक्रम, जनजागृती तसेच ललित कला, साहित्य, संगीत, नृत्य आविष्काराच्या माध्यमातून निसर्ग आणि कला यांचा अनुभव गुलमोहर 'डे' दिवशी अधोरेखित केला जातो. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कलाकार रसिक व पर्यावरण प्रेमी यांनी आजच्या गुलमोहर 'डे' मध्ये सहभागी झाले होते. दोन सत्रात गुलमोहर 'डे' साजरा करण्यात आला. सकाळी चित्रकार मांडण शिल्प चित्रकारांची प्रात्यक्षिके ज्येष्ठ कलावंत यांचे मार्गदर्शन तर संध्याकाळच्या सत्रात काव्यवाचन करण्यात येणार आहे.

गेली सतरा वर्षे साताऱ्यातील पर्यावरण प्रेमी सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ कलावंतांचा पुढाकाराने हा गुलमोहर 'डे' दरवर्षी 1मे ला साजरा केला जातो. आज सुद्धा सातारा दूध संघ समोर असलेल्या मोठ्या गुलमोहरच्या झाडा खाली गुलमोहर 'डे' चे नियोजन करण्यात आले होते. गुलमोहर च्या झाडाखाली ठीक ठिकाणी चित्रकला मांडण शिल्पाचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. तसेच शालेय विद्यार्थी गुलमोहराच्या झाडाखाली बसून गुलमोहर चित्र रेखाटत होती. साताऱ्यातील अनेक मान्यवरांनी या ठिकाणी आवर्जून सहभाग नोंदवला. या कार्यक्रमात आबालवृद्धांचा सहभाग लक्षणीय होता. रखरखत्या उन्हात गुलमोहर बहावा शिरीष या झाडांच्या फुलांची रंगाची उधळण सजग मानांनी टिपावी निसर्गाच्या रंगउत्सवात रंगून जाताना पर्यावरण भान निर्माण व्हावे हा उद्देश जपाला जावा यासाठी दरवर्षी साताऱ्यात गुलमोहर 'डे' साजरा केला जातो.

व्हिडिओ सेंड व्हाट्सएप सातारा

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.