सातारा - क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालय, सातारा येथे कोरोनाबाधित रुग्णांच्या सहवासात असलेल्या 17 वर्षीय युवकास या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. आता शनिवारी त्याच्या स्वॅबचा नमुना पुर्नतपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आला होता. या तपासणीत या युवकांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणाऱ्या 9 तसेच उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे दाखल असणाऱ्या 4 अशा एकूण 13 संभाव्य रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे. ही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
लाॅकडाऊनबाबत साताराचे जिल्हाधिकारी म्हणाले...
सर्वाधिक रुग्ण असणारे जिल्हे हे रेड झाेनमध्ये समाविष्ट केले जातात. सातारा जिल्ह्याचा आॅरेंज झाेनमध्ये समावेश झाला हाेता. त्यावेळी रुग्ण संख्या हाताच्या बाेटावर माेजण्याइतकी हाेती. आज मितीस रुग्णांची संख्या १४ झाली आहे. यामुळे सातारा जिल्ह्याची रेड झाेनकडे वाटचाल हाेते की काय, अशी चिंता व्यक्त केली आहे.
रविवारी सायंकाळी- 5 वाजताची सातारा जिल्हा कोरोना आकडेवारी
1.जिल्हा ग्रामीण रुग्णालय , सातारा 379
2. कृष्णा हॉस्पीटल, कराड- 276
3.एकूण दाखल -655
प्रवासी-120,
निकट सहवासीत-403,
श्वसन संस्थेचा तीव्र जंतू संसर्ग-132
एकूण 655
4. बाधित 14