सातारा - श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने २ ते ५ जुलै दरम्यान सातारा जिल्ह्यातील लोणंद, तरडगाव, फलटण आणि बरड येथे मुक्काम केला. त्यानंतर ही पालखी धर्मपुरी येथून आज सातारा जिल्हा प्रशासनाकडून सोलापूर जिल्हा प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, प्रांताधिकारी संतोष जाधव आणि तहसीलदार हनुमंत पाटील उपस्थित होते.
सातारा जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे आज धर्मपुरी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराजाची पालखी हस्तांतरित केली. यावेळी सोलापूरचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड, सोलापूरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे उपस्थित होते. पालखी हस्तांतरानंतर पालखी सोहळ्या दरम्यान काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.