ETV Bharat / state

Suicide : आत्महत्या करणारी विवाहित महिला पोलीस नाही, तपासात धक्कादायक खुलासा

फलटण तालुक्यातील नागेश्वरनगर येथील ऋतुजा सुशांत रासकर (वय 22) या विवाहित तरुणीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलीस नसताना तिने खाकी गणवेशात स्वत:चे फोटो काढले होते. ती पोलीस असल्याचे नातेवाईकांना सांगत होती.

Suicide
Suicide
author img

By

Published : Jun 28, 2023, 10:49 PM IST

सातारा : फलटण तालुक्यातील नागेश्वरनगर येथील एका विवाहित तरुणीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती तपासात उघड झाली आहे. ऋतुजा सुशांत रासकर (वय 22) असे या विवाहित तरुणीने नाव आहे. तिने राहत्या घरी आत्महत्या केली. ती स्वत: पोलीस असल्याचे नातेवाईकांना सांगत होती. तसेच तिचे वर्दीतले फोटो देखील समाज माध्यमावर उपलब्ध आहेत. ऋतुजा सुशांत रासकर (वय २२) ही पोलीस अधिकारी नव्हती. पण, तिने खाकी गणवेशात स्वत:चे फोटो काढले. ती पोलीस असल्याचे नातेवाईकांना सांगत होती. ती असे का करत होती, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

पोलीस असल्याचे नातेवाईकांना सांगितले : ऋतुजा रासकर हिने राहत्या घरी आत्महत्या केली होती. ती मुंबई पोलिस दलात असल्याची माहिती मिळताच फलटण पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. त्यावेळी तपासात धक्कादायक माहिती समोर आली. ऋतुजा रासकर ही मुंबई पोलीस दलात नोकरीला असल्याचे नातेवाईक, गावकऱ्यांना सांगत होती. मात्र ते सत्य नव्हते.

सोशल मीडियावर गणवेशातील फोटो : मुंबई पोलिसांच्या पीसीआर बाइकवर बसलेले तसेच खाकी वर्दीतील फोटो ऋतुजाने सोशल मीडियावर अपलोड केले होते. सोशल मीडियावर तिचे फॉलोअर्स 50 हजारांहून अधिक आहेत. फोटोवरून ती मुंबई पोलीस दलात कार्यरत असल्याचे सर्वांना वाटले होते.

तपासात धक्कादायक माहिती समोर आली : ऋतुजा रासकर ही मुंबई शहर पोलीस मुख्यालयात असल्याची माहिती मिळताच फलटण शहर पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी कसून चौकशी सुरू केली. त्यावेळी रासकर पोलीस अधिकारी नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऋतुजाने नातेवाईक ग्रामस्थांना खोटी माहिती का दिली? याचे कारणही पोलिसांनी पुढे आणले आहे. ऋतुजाचा आंतरजातीय विवाह झाला होता. त्यामुळे तिच्या कुटुंबातील लोक नाराज झाले. त्यांची सहानुभूती मिळवण्यासाठी ऋतुजाने आपण पोलीस असल्याचे सांगितले होते. ती पोलीस नाही, हे तिच्या पतीला माहीत होते. घरात सापडलेला बक्कल नंबर दुसऱ्या पोलिसाचा असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा - Woman Police Suicide : मुंबई पोलीस मुख्यालयातील महिला कॉन्स्टेबलची फलटणमध्ये आत्महत्या; कारण अस्पष्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.