कराड (सातारा) - रिझर्व्ह बँकेने कराड जनता सहकारी बँकेचा परवाना रद्द करून बँकेची दिवाळखोरी जाहीर केली आहे. परंतु 99 टक्के लोकांना त्यांचे सर्व पैसे परत मिळणार असल्याचेही रिझर्व्ह बँकेने यासंदर्भातील आदेशात म्हटलं आहे.
कराड जनता बँक दिवाळखोरीत निघाल्यानंतर बँकेचे हजारो सभासद हवालदील झाले होते. आपले पैसे परत मिळणार की नाही, अशी चिंता त्यांना होती. या संदर्भात रिझर्व्ह बँकेने कराड जनता बँकेच्या दिवाळखोरीबाबत पारित केलेल्या आदेशात 99 टक्के लोकांना त्यांचे पैसे परत मिळतील, असे म्हटलं आहे.
बँक दिवाळखोरीत निघाल्यामुळे सभासदांच्या शेअर्सची किंमत शून्य झाली आहे. त्यामुळे शेअर्सची रक्कम परत मिळणार नाही. परंतु बचत खात्यावर असणारे पैसे परत मिळतील, असे अवसायक तथा सहकारी संस्था उपनिबंधक मनोहर माळी यांनी सांगितले.
बँक कर्मचाऱ्यांचे काय?
कर्मचार्यांच्या नोकरीवर दिवाळखोरीमुळे गंडांतर आले आहे. मात्र, लगेच कर्मचार्यांना कामावरून काढले जाणार नाही. कामकाजासाठी आणखी काही दिवस कर्मचार्यांची गरज आहे. त्यानंतरच कर्मचार्यांची सेवा समाप्त होईल. ज्या ठिकाणी गरज असेल, त्या शाखेचे कामकाज सुरू ठेवले जाईल. त्यासाठी कंत्राटी पध्दतीने कर्मचारी घेतले जातील, असे माळी म्हणाले.
हेही वाचा - 'ऐपत असणाऱ्यांनीच पाल्यांना खासगी शाळेत शिकवा'; साताऱ्यातील शाळेचा पालकांना अजब सल्ला!
हेही वाचा - 'सुपर ६०' नंतर काँग्रेसची 'सुपर १०००' मोहीम; आगामी निवडणुकांमध्ये तरुण-तरुणींना देणार उमेदवारी