सातारा - कोयना जलाशयातील पाण्याने तळ गाठल्यानंतर मागील तीन-चार महिन्यांपासून बंद पडलेली तराफा सेवा आता पुन्हा सुरू झाली आहे. ही सेवा सुरू करण्याची सूचना खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यामुळे दरवर्षी १५ ऑगस्टला सुरू होणारी तराफा सेवा यंदा लवकर सुरू झाली आहे.
पंधरा दिवस आधीच सेवा सुरू - दरवर्षी १५ ऑगस्टला सुरू होणारी तराफा सेवा यंदा तेरा दिवस आधीच सुरू झाली आहे. तापोळा-तेटली आणि दरे गावातील लोकांना प्रवास करता यावा, यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने ही सेवा सुरू केली आहे.
पाण्याअभावी तराफा सेवा पडली बंद - यंदा पाऊस लांबल्याने कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात कमालीची घट झाली होती. त्यामुळे धरणाचा भाग उघडा पडला होता. सर्वत्र जलाशयात बुडालेल्या गावांचे अवशेष आणि गाळ पाहायला मिळत होता. यामुळे कोयना जलाशयाच्या आतील दुर्गम भागाच्या दळणवळणाचा भाग असणारी बोट सेवा तसेच तराफा सेवा देखील बंद पडली होती.
पावसाळ्यात दळणवळण होते ठप्प - पावसाळा आला की कोयना धरण परिसरातील दुर्गम गावातील रस्ते व पूल पाण्याखाली जातात. त्यामुळे लोकांना पावसाळ्यात कोणत्याही प्रकारे दळणवळण करता येत नाही. त्यांना बोटीच्या माध्यमातून प्रशासनाकडून सुविधा पुरवल्या जातात. यंदाही सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळू लागल्याने पूर आणि दरडींचा धोका होता.
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार तराफा सेवा सुरू - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावास बोटीच्या माध्यमातून पावसाळ्यात सेवा पुरवली जाते. दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी सुरू तराफा सेवा सुरू केली जाते. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार तापोळा-तेटली आणि दरे गावातील लोकांना प्रवास करता यावा, यासाठी प्रशासनाच्या वतीने तेरा दिवस आधीच तराफा सेवा सुरु करण्यात आली आहे.
हेही वाचा -