सातारा : कर रूपातून देश चालवता येत नसल्याने सरकारी मालमत्ता विकून देश चालवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. ( Prithviraj Chavan attack on central government ) खासगीकरण झाल्यास आरक्षण राहणार नाही. अदानी-अंबानींना केंद्र सरकारचा आशीर्वाद आहे. ही मंडळी एका बाजूला देशाचे वाटोळे करायला निघाले आहेत तर दुसऱ्या बाजूला राज्यात खोक्यांचे सरकार निर्माण झाले आहे, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.
राज्यात अस्थिर परिस्थिती : कराड तालुक्यातील म्हासोली प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे उद्धघटन, विकास सोसायटी इमारतीचे भूमिपूजन आणि संचालकांच्या सत्कार कार्यक्रमात बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, विचार व विकास शाश्वत असतो. राज्यात अस्थिर परिस्थिती आहे. देशाची अर्थव्यवस्था बिकट बनली आहे. शचीनच्या सीमेवर आपले वीस जवान शहीद झाले. तरीही केंद्र सरकार गप्प आहे. दरडोई उत्पन्नात 170 देश आपल्यापुढे आहेत. मूठभर लोकांनी वर्णभेदातून निर्माण केलेली विषम परिस्थिती काँग्रेसने बदलली. यातून लोकशाही प्रजासत्ताक राज्य निर्माण झाले. या क्रांतीमुळे ज्यांचे नुकसान झाले. त्यांच्या पोटात आगीचे सुळ उठत आहेत. ते पुन्हा आपल्याला गुलाम करण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. (central government blessings to Adani Ambani )
विचारधारेतून विकासाची ऊर्जा : प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील म्हणाले, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासकाका उंडाळकरांनी विकासाच्या अधिष्ठानावर माणसे उभी केली. त्यामुळे कराड दक्षिण मतदारसंघ कायमच राष्ट्रीय विचाराला साथ देईल. केवळ इतिहास कुरवाळून चालणार नाही. प्रतिगामी विचार समाजाला वेगळ्या दिशेने घेवून चालले आहेत. सरंजाम व भांडवलदारांच्या जोखडातून आपल्याला सोडवून घ्यावे लागणार आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांची शिदे भाजप सरकारवर देखील टीका : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री यांना जामीन मंजूर झाला असून आज ते जेलमधून बाहेर येणार आहे. यावर काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, सध्या राज्यात न्याय व्यवस्थेचा ( justice system ) गौर वापर चालला आहे. अनिल देशमुख यांना दीड वर्ष आत ठेवले. नवाब मलिक अजूनही आत मध्ये आहे. खटला दाखल न करता फक्त हे सरकार दाबून ठेवत आहे. हे राजकीय हत्यार म्हणून वापरल जात आहे. हे खूप दुर्दैवी असल्यास मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.