ETV Bharat / state

सातारा मांडवे दरोड्यातील संशयित आरोपी जेरबंद - accuse

१४ फेब्रुवारीला सिद्धेश्वर कुरोली (ता.खटाव) येथील जाधव वस्तीवर मध्यरात्री दरोडा टाकला होता. या दरोड्यामध्ये ३९ हजार ५०० रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती. या प्रकरणी वडूज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सातारा मांडवे दरोडयातील संशयित आरोपी जेरबंद
author img

By

Published : Jun 10, 2019, 8:25 PM IST

सातारा - खटाव येथे 2 जूनला पडलेल्या दरोड्यातील तिघा संशयितांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या दरोड्यातील सुमारे ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सातपुते पुढे म्हणाल्या, 2 जूनला मांडवे (ता. खटाव) येथे मध्यरात्रीच्या सुमारास ५ अनोळखी दरोडेखोरांनी बर्गे यांच्या घरात घुसून सुरज लोखंडे यांना मारहाण करत दरोडा टाकला होता. १४ फेब्रुवारीला सिद्धेश्वर कुरोली (ता.खटाव) येथील जाधव वस्तीवर मध्यरात्री दरोडा टाकला होता. या दरोड्यामध्ये ३९ हजार ५०० रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती. या प्रकरणी वडूज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मांडवे येथील दरोड्याचा तपास करत असताना अभिलेखावरील गुन्हेगारांनी हे दोन्ही दरोडे टाकल्याचे निष्पन्न झाले होते. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने अभिलेखावरील गुन्हेगार करण काळे त्यांचा साथीदार ऋतुराज शिंदे (रा. काटकरवाडी ता.खटाव) व एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले.

तिघांनी नागेश सदशिव भोसले (रा.करपडी ता. कर्जत जि.अहमदनगर) दरोड्यामध्ये सहभागी असल्याची माहिती दिली. त्यानुसार सातारा पोलिसांनी नागेश भोसले यांनाही ताब्यात घेतले. संशयित आरोपींनी दोन्ही दरोड्याची कबुली दिली आहे. खटाव तालुक्यातील मांडवा सिद्धेश्वर कुरवली दरोड्यातील सुमारे ८४ हजार पाचशे रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.

Intro:सातारा (खटाव) येथे 2 जून रोजी पडलेल्या दरोडयातील तिघा संशयितांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून, या दरोड्यातील सुमारे पाऊन लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात सातारा पोलिसांना यश आले असल्याची माहिती जिल्हा पोलिस अध्यक्ष तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.

Body:पत्रकार परिषदेत तेजस्वी सातपुते म्हणाल्या दिनांक 2 जून 2019 रोजी मांडवे ता.खटाव येथे मध्यरात्रीच्या सुमारास पाच अनोळखी दरोडेखोरांनी बर्गे यांच्या घरात घुसून सुरज लोखंडे यांना मारहाण करीत धाडसी दरोडा टाकला होता. तसेच 14 फेब्रुवारी रोजी सिद्धेश्वर कुरोली ता.खटाव येथील जाधव वस्ती वर मधी रात्री दरोडा टाकला होता. या दरोड्यामध्ये 39 हजार 500 रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती. या प्रकरणी वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मांडवे येथील दरोड्याचा तपास करीत असताना अभिलेखा वरील गुन्हेगारांनी हे दोन्ही दरोडे टाकले निष्पन्न झाले होते. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने अभिलेखा वरील गुन्हेगार करण वरिसऱ्या काळे त्यांचा साथीदार ऋतुराज भावज्या शिंदे रा. काटकरवाडी ता.खटाव व एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले. त्यावेळी त्या तिघांनी नागेश सदशिव भोसले रा.करपडी ता. कर्जत जि.अहमदनगर दरोडा मध्ये सहभागी असल्याची माहिती दिली. त्यानुसार सातारा पोलिसांनी नागेश भोसले यांनाही ताब्यात घेतले संशयित आरोपींनी दोन्ही दरोड्याची कबुली दिली आहे. खटाव तालुक्यातील मांडवा सिद्धेश्वर कुरवली दरोड्यातील सुमारे 84 हजार पाचशे रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

व्हिडिओ सेंड whats app

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.