मुंबई : नवीन वर्ष जवळ येत आहे, साऊथ सुपरस्टार राम चरण त्याच्या चाहत्यांसाठी आता 'गेम चेंजर' घेऊन येत आहे. त्याचा हा आगामी चित्रपट 10 जानेवारी 2025 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सध्या चाहते या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल खूप उत्सुक आहेत. अखेर 'गेम चेंजर'च्या ट्रेलर रिलीजची तारीख समोर आली आहे. दुसरीकडे, लोकांमध्ये त्याच्या चित्रपटाची इतकी क्रेझ आहे की, आंध्र प्रदेशमध्ये राम चरणचा एक मोठा कटआउट लावण्यात आला. त्याचा हा कटआउट हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी राम चरणबरोबर दिसणार आहे.
राम चरणचा कटआउट आंध्र प्रदेशमध्ये लावला गेला : राम चरण आणि कियारा अडवाणी यांना एकत्र पाहण्यासाठी अनेक चाहते खूप आतुर आहेत. 'गेम चेंजर' चित्रपटाचे निर्माते दिल राजू यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात चित्रपटाविषयी रोमांचक अपडेट्स शेअर करताना सांगितलं की, "गेम चेंजर' चित्रपटाचा ट्रेलर नवीन वर्षाची भेट म्हणून प्रदर्शित केला जाईल. ट्रेलर तयार आहे, पण तुमच्यासमोर रिलीज करण्यापूर्वी आणखी काही काम करणे बाकी आहे. ट्रेलर चित्रपटाची श्रेणी ठरवतो, आम्ही तुम्हाला तो अनुभव द्यायला तयार आहोत. नवीन वर्षाच्या मुहूर्तावर 1 जानेवारीला हा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे." याशिवाय 'गेम चेंजर'च्या निर्मात्यानं चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटची माहिती देखील शेअर केली.
India's BIGGEST 2⃣5⃣6⃣ft Ram Charan cut out launched🚁 pic.twitter.com/lUfubsQwfe
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) December 29, 2024
राम चरण दिसणार आयएएस अधिकाऱ्याच्या भूमिकेत : 'गेम चेंजर'बद्दल त्यांनी म्हटलं की, "आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्याची योजना आहे." ट्रेलर रिलीजपूर्वी राम चरणचा 256 फूट कटआउट बसवण्यात आला आहे. सोशल मीडियावर त्याचा हा कटआउटचा व्हिडिओ पाहून अनेकजण यावर प्रतिक्रिया देत आहेत. 'गेम चेंजर' हा आगामी राजकीय ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध चित्रपट निर्माते एस शंकर यांनी केलंय. 'गेम चेंजर' चित्रपटाची कहाणी कार्तिक सुब्बाराज यांनी लिहिली आहे. या चित्रपटात राम चरण हा एक आयएएस अधिकारी आहे, जो भ्रष्ट राजकीय व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी लढतो. या चित्रपटात राम चरण दुहेरी भूमिका साकारू शकतो, असं टीझरवरून वाटत आहे.
हेही वाचा :