ETV Bharat / entertainment

श्रद्धा कपूर ते रश्मिका मंदान्नापर्यंत 'या' अभिनेत्रींचे चित्रपट 2024मध्ये 500 कोटी क्लबमध्ये झाले दाखल - 500CR CLUB IN 2024

2024मध्ये कमाईच्या बाबतीत अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. त्याचबरोबर यावर्षी काही अभिनेत्रींच्या चित्रपटांनी 500 कोटींच्या क्लबमध्ये देखील प्रवेश केला आहे.

500cr club
500 कोटी क्लब (इंडियन एक्ट्रेस (Teaser Screengrab))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Dec 30, 2024, 1:16 PM IST

मुंबई : 2024 वर्ष दोन दिवसांनी संपणार आहे. हे वर्ष मनोरंजनाच्या दृष्टीनं खूप खास ठरलं आहे. चालू वर्षात बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक विक्रम रचले गेले आहेत. दरम्यान 'पुष्पा 2' हा 2024 वर्षातील सर्वात धमाकेदार चित्रपट ठरला आहे. साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा चित्रपट गेल्या 25 दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. चालू वर्षात दोन चित्रपटांनी 1000 कोटींचा टप्पा पार केला आहे. याशिवाय तीन चित्रपटांनी 500 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आता 2024 वर्ष कुठल्या अभिनेत्रींसाठी चांगलं ठरलं हे आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.

श्रद्धा कपूर : 14 ऑगस्ट रोजी रिलीज झालेल्या बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा हॉरर कॉमेडी चित्रपट 'स्त्री 2'नं बॉक्स ऑफिसवर रिलीज होताच खळबळ उडवून दिली होती. हा चित्रपट 2024 मधील पहिला 500 कोटी कमाई करणार चित्रपट ठरला. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 'स्त्री 2'नं 600 कोटी आणि जगभरात 800 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. या कमाईसह, 'स्त्री 2'नं शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाचे अनेक विक्रमही मोडले. 2024मधील हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणजे 'स्त्री 2' आहे. याशिवाय 'भूल भुलैया 3', 'सिंघम अगेन' आणि 'शैतान' हे बॉक्स ऑफिसवर 500 कोटींची टप्पा पार करू शकले नाही.

दीपिका पदुकोण : 2024 मधील पहिला तेलुगू हिट चित्रपट 'कल्की 2898 एडी' आहे. या चित्रपटानं जगभरात 1100 कोटींहून अधिक व्यवसाय केला आहे. 'कल्की 2898 एडी' चित्रपटात प्रभासबरोबर दीपिका पदुकोण आणि दिशा पटानी या दोन बॉलिवूड अभिनेत्री होत्या. या चित्रपटानं रुपेरी पडद्यावर 500 कोटीहून अधिक कमाई केली. नाग अश्विन यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'कल्की 2898 एडी' या चित्रपटात मेगास्टार अमिताभ बच्चन यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका केली होती. गेल्या वर्षी दीपिका पदुकोणच्या 'पठाण' आणि 'जवान'नं रुपेरी पडद्यावर 500 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.

रश्मिका मंदान्ना : 2024 साली 500 कोटी क्लबमध्ये प्रवेश करणारा तिसरा चित्रपट म्हणजे 'पुष्पा 2', जो 5 डिसेंबर रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर चित्रपट 'पुष्पा 2'नं देशांतर्गत 1000 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. जगभरात या चित्रपटानं 1700 कोटीहून अधिक कमाई केली आहे. रश्मिका मंदान्नाचा हा 500 कोटींचा दुसरा चित्रपट आहे. याआधी 2023 मध्ये रश्मिका मंदान्नाचा 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्ये दाखल झाला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.