सातारा : शाहूपुरीतील पेंडसेनगरमध्ये, मोकळ्या रानात क्रिकेट खेळणाऱ्या 10 जणांविरुद्ध शाहूपुरी पोलिसांनी जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. लॉकडाऊनच्या काळात घरातून बाहेर पडू नका, असे वारंवार सर्वत्र सांगितले जात आहे. तरीही या लोकांना क्रिकेट खेळायची हुक्की आली. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पोलीस पेट्रोलिंग करत त्यांना ही मंडळी दिसली.
रोहित दत्तात्रय कडव (वय 27), सचिन भानुदास चव्हाण (वय-34 ), संदीप भानुदास चव्हाण (वय-34), सुभाष रामदेव चौरसिया (वय-25), गंगाराम रामकिशोर चौरसिया (वय-28), सोहेल गौस शेख (वय-24), सोमनाथ बाबुराव इंगवले (वय-45), सरवर गौस शेख (वय-30), राजेंद्र सर्जेराव डफळ (वय-34), विकास राजेश मोटवानी (वय-24 , सर्व रा-पेंडसेनगर शाहुपुरी सातारा) अशी या क्रिकेटवीरांची नावे आहेत.
याप्रकरणी त्यांच्याविरुध्द पोलीस नाईक धनंजय कुंभार यांनी भा.द.वि.क.188,269,आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51(ब),महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37(3) प्रमाणे तक्रार दिली आहे.