सातारा : फलटण ग्रामीण पोलिसांनी (Phaltan Rular Police arrested motorcycle thief ) धुमाळवाडी येथे पाठलाग करुन पकडलेल्या तीन संशयितांकडून चोरीचे दहा गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी त्यांना अटक केली (Phaltan police arrested motorcycle thief from Satara) असून त्यांच्याकडून ९ मोटरसायकलींसह साडे सात लाखांचा मुद्देमाल जप्त (Seven and a half lakh worth of goods seized) करण्यात आला आहे.
ओढ्याच्या पुरातून संशयितांचा थरारक पाठलाग - पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी विशेष पथक तयार केले होते. पथकास मिळालेल्या माहितीवरून फलटण ग्रामीण पोलिसांनी धुमाळवाडी (ता. फलटण) येथे श्रेयस नाळे, अमित हुंबे, गणेश जगदाळे यांना मुसळधार पावसात व ओढ्यातील पुराच्या पाण्यातून पाठलाग करुन पकडले. चौकशीमध्ये फलटणसह मुंबई, पुणे शहर, खेड शिवापुर, शिरवळ, इंदापुर परिसरातून नऊ मोटरसायकली आणि एक औषध फवारणीचा एचटीपी पंप चोरल्याची कबुली दिली.
श्रेयस उत्तम नाळे (रा. दुधेबावी, ता. फलटण), अमित विठ्ठल हुंबे (रा. धुमाळवाडी, ता. फलटण), गणेश अरुण जगदाळे (रा. मोगराळे, ता. माण), अशी संशयितांची नावे आहेत.
साडे सात लाखांचा मुद्देमाल जप्त - पोलिसांनी संशयितांकडून नऊ मोटरसायकली आणि औषध फवारणी पंप, असा एकूण ७ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयितांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून पोलीस संशयितांकडे कसून चौकशी करत आहेत. सहायक पोलीस निरिक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, सहाय्यक फौजदार भिकू राऊत, हवालदार प्रकाश खाडे, पोलीस नाईक अभिजीत काशिद, वैभव सूर्यवंशी, अमोल जगदाळे, कॉन्स्टेबल महेश जगदाळे, विक्रम कुंभार, सचिन पाटोळे, निखील गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.