ETV Bharat / state

सातारा : महाबळेश्वर-पाचगणीसह जिल्ह्यातील पर्यटनस्थळे खुली करण्यास परवानगी, मात्र... - Satara tourist spots opened

अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत असतानादेखील पर्यटनस्थळे बंदच होती. गेल्या आठ महिन्यात जिल्ह्याचे पर्यटनाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

Mahabaleshwar- Pachgani tourist places
महाबळेश्वर- पाचगणीसह जिल्ह्यातील पर्यटनस्थळे खुली
author img

By

Published : Nov 5, 2020, 3:41 PM IST

Updated : Nov 5, 2020, 7:32 PM IST

सातारा - महाबळेश्वर, पाचगणी, तापोळा याबरोबरच जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे खुली होणार आहेत. प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी याबाबतचे आदेश निर्देश दिले आहेत. मात्र, सहल तसेच गट पर्यटनाला प्रतिबंध असणार आहे. पर्यटन करत असताना कोरोना साथरोगाचे भान प्रत्येकाला ठेवावे लागणार आहे.

माहिती देताना व्यावसायिक

८ महिन्यात कोट्यवधीचे नुकसान

कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर महाबळेश्वर, पाचगणी, तापोळा तसेच जिल्ह्यातील इतर पर्यटनस्थळे बंद करण्यात आली होती. अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत असतानादेखील पर्यटनस्थळे बंदच होती. गेल्या आठ महिन्यात जिल्ह्याचे पर्यटनाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच, शासकीय महसुलाबरोबरच पर्यटनावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना उपासमारीला तोंड द्यावे लागते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महाबळेश्वर, पाचगणीसह जिल्ह्याच्या विविध भागातील पर्यटनस्थळे खुली करावी, अशी मागणी जोर धरत होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पर्यटनस्थळ खुली करण्याचे आदेश काढले आहेत.

सामाजिक अंतर राखण्याची जबाबदारी संबंधित विभागावर

पर्यटनस्थळांना भेटी देणाऱ्या पर्यटकांना सामाजिक अंतर राखण्याबाबत संबंधित विभागामार्फत सूचित करण्यात यावे व रांग पद्धतीचा अवलंब करावा. पर्यटनस्थळी सामाजिक अंतर राखण्यासाठी १ मीटर अंतरावर खुणा कराव्यात. तेथे गर्दी होणार नाही, यासाठी काटेकोरपणे नियोजन करण्याची जबाबदारी संबंधित विभागावर देण्यात आली आहे. तसेच, गर्दी टाळण्यासाठी स्वतंत्ररित्या एन्ट्री व एक्झिट पॉईंट करावेत. प्रवेशद्वाराजवळ सामाजिक अंतर राखून पर्यटकांचे तापमान, ऑक्सिजन पातळी याची तपासणी करावी. या पर्यटकांचे नाव, पत्ता, वय, को-मॉर्बिडिटी, तापमानव मागील १४ दिवसाच्या प्रवासाच्या माहितीची नोंद रजिस्टरमध्ये करण्याच्या सूचना प्रशासनाने संबंधित विभागांना दिल्या आहेत.

बोटिंगमुळे ५ लाखांचे उत्पन्न

महाराष्ट्राचे नंदनवन समजल्या जाणा महाबळेश्‍वर येथील पर्यटनस्थळे खुली झाली असून आठवडाभरात वेण्णा लेकवरील बोट क्लबला सुमारे ५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. महाबळेश्‍वर पालिकेस उत्पन्न मिळवून देणाऱ्या विभागात वेण्णा लेकचा मोठा वाटा आहे. लॉकडाऊनमुळे गेली आठ महिने वेण्णा लेक येथील बोटक्लबसह संपूर्ण महाबळेश्‍वरमधील पर्यटन ठप्प झाले होते. महाबळेश्‍वरचे खरे आकर्षण असलेले वनविभागाच्या अधिपत्याखालील पिकनीक पॉइंट अद्याप बंद असले, तरी प्रसासनाच्या सूचनेनुसार दोन दिवसात ते सुरू होतील, असे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे. गेल्याच आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी वेण्णालेक बोट क्लब व घोडेसवारीला परवानगी दिली आहे. व्यावसायिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असून स्थानिक बाजारपेठेला उभारी मिळू लागली आहे.

हेही वाचा- सोशल मीडियावर उद्धव ठाकरे, शरद पवारांची बदनामी; दोघांवर गुन्हा दाखल

Last Updated : Nov 5, 2020, 7:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.