ETV Bharat / state

पाऊस.. प्रचार अन् पवार...

सध्या पावसात भिजत भाषण करत असतानाचा फोटोने व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा सर्व प्रकारच्या समाज माध्यमांवर धुमाकूळ घातला आहे. हा फोटो कुण्या अभिनेत्याचा किंवा सेलीब्रीटीचा नाही. तो फोटो आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा!

शरद पवार
author img

By

Published : Oct 18, 2019, 11:20 PM IST

Updated : Oct 19, 2019, 8:37 AM IST

सातारा - सध्या पावसात भिजत भाषण करत असतानाच्या एका नेत्याच्या फोटोने व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा सर्व प्रकारच्या समाज माध्यमावर धुमाकूळ घातला आहे. हा फोटो कुण्या अभिनेत्याचा किंवा सेलिब्रीटीचा नाही. तो फोटो आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा ! विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ पवार यांनी सातारा येथे पाऊस सुरू असतानाच लोकांना संबोधित केले.

पवार.. पाऊस अन् प्रचार...

येत्या २१ तारखेला होणाऱ्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साक्षात वरुणराजाने देखील आज आशीर्वाद दिले असल्याचे सांगत शरद पवार यांनी आपल्या भाषणाला जोरदार सुरुवात केली.

यावेळी सातारा मतदारसंघातून लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उभे असलेले उदयनराजे भोसले यांना शरद पवार यांनी टोला लगावला. 'लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्याकडून चूक झाली, हे मी जाहीरपणे कबुल करतो. ती चूक सुधारण्यासाठी साताऱ्याच्या प्रत्येक माणसाला संधी आहे', असे म्हणत पवार यांनी उपस्थितांना आवाहन केले.

सध्या विधानसभा निडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचे राज्यभरात झंझावाती दौरे चालू आहेत. साताऱ्यात चालू असणाऱ्या सभेत पावसाला सुरुवात झाल्यानंतरही पवार भाषण करत उभे राहिल्याने राज्यभर हा चर्चेचा विषय ठरला आहे.

Intro:Body:

Satara - NCP President Sharad Pawar Speech in Rain. Sharad Pawar addressing Satara Rally. 

Conclusion:
Last Updated : Oct 19, 2019, 8:37 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.