ETV Bharat / state

संजय शिंदे दहा दिवसांनी माझ्यासोबत दिल्लीला जाणार - शरद पवारांचे भाकित - दुष्काळी दौरा

उपस्थित समुदायला प्रश्न विचारत म्हणाले "तुम्ही त्यांना मतदान केले आहे ना.." त्यावर सर्वांनी 'हो' म्हणून उत्तर दिले. यावेळी त्यांच्यासोबत संजय शिंदे हेही उपस्थित होते. त्यांनाही हा प्रकार पाहून हसू आवरले नाही.

शरद पवार
author img

By

Published : May 13, 2019, 7:24 PM IST

सातारा - संजय शिंदेंना दहा दिवसांनी दिल्लीला जायचे आहे. त्यामुळे त्यांना दहा दिवसानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागणार असल्याचे भाकित राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. ते माण तालुक्यात दुष्काळी दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी माढा लोकसभेच्या जागेसंदर्भात भाष्य केले. दौऱ्यात पवार यांनी माण तालुक्यातील अनेक चारा छावण्यांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.

माढा मतदारसंघातील विजय संदर्भात भाष्य करताना शरद पवार म्हणाले, दहा दिवसांनी संजय शिंदे यांना राजीनामा द्यावा लागणार आहे. कारण दहा दिवसांनी संजय शिंदे आमच्यासोबत दिल्लीला येणार आहेत. त्यामुळे त्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागेल. असे भाकित पवार यांनी वर्तवले. तसेच त्यांनी उपस्थित समुदायला प्रश्न विचारत म्हणाले "तुम्ही त्यांना मतदान केले आहे ना.." त्यावर सर्वांनी 'हो' म्हणून उत्तर दिले. यावेळी त्यांच्यासोबत संजय शिंदे हेही उपस्थित होते. त्यांनाही हा प्रकार पाहून हसू आवरले नाही.

माढा लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा राष्ट्रवादीचाच असणार, अशी गर्जना शरद पवार यांनी केल्यानंतर उपस्थित जनसमुदायतून टाळ्याचा कडकडाट झाला. संजय शिंदेंना दिल्लीत आल्यानंतर माढा मतदारसंघात असणाऱ्या दुष्काळ परिस्थितीवर कशाप्रकारे मात करता येईल. तसेच शेती कशाप्रकारे वाढेल, याकडे लक्ष देऊन माढा लोकसभा मतदारसंघाचा विकास कामे करण्याची गरज असल्याचेही पवार म्हणाले.

पवार यांनी रोजगार हमीतून सुरू असलेल्या कामावर जाऊन मजुरांशी चर्चा केली. तसेच पीक विमा संदर्भातील त्यांनी कंपनीला जाब विचारून सरकारलाही जाब विचारणार असल्याचे सांगितले.

Intro:सातारा माण तालुक्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दौऱ्यावर आले होते. त्यांनी तालुक्यातील अनेक चारा छावण्यांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला तसेच रोजगार हमीतून सुरू असलेल्या कामावर जाऊन मजुरांशी चर्चा करून मजुरी किती व वेळेवर पगार मिळतो का..? सध्याची परिस्थिती अशी मजुरी तोकडी पडत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच पिक विमा संदर्भातील त्यांनी कंपनीला जाब विचारून सरकारलाही जाब विचारणार असल्याचे सांगितले आहे. मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच माढयाचा खासदार कोण याबाबत पवारांनी भाष्य केले.

Body:माढा मतदारसंघातील विजय संदर्भात भाष्य करताना शरद पवार म्हणाले, बारा दिवसांनी संजय मामा शिंदे यांना राजीनामा द्यावा लागणार आहे. कारण बारा दिवसांनी संजय शिंदे आमच्या सोबत दिल्लीत येणार आहेत. त्यामुळे त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागेल. याचा खुलासाही पवार यांनी केला. तसेच उपस्थित समुदायाला प्रश्न विचारत म्हणाले "तुम्ही त्यांना मतदान केले आहे ना.." त्यावर सर्वांनी 'हो' म्हणून उत्तर दिले. यावेळी त्यांच्यासोबत असणारे संजय मामा शिंदे यांना हसू आवरले नाही. त्याने तोंडाला हात लावून हसणे सुरुवात केली. यामुळे माढा लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा राष्ट्रवादीचा असणार असे प्रतिपादन शरद पवार यांनी केल्यानंतर जनसमुदायतून मोठ्या टाळ्या वाजल्या गेल्या. तसेच संजय शिंदेंना दिल्लीत आल्यानंतर आपल्या या मतदारसंघात असणाऱ्या दुष्काळ परिस्थितीवर कशाप्रकारे मात करता येईल. तसेच उसाची शेती कशाप्रकारे वाढेल याकडे लक्ष देऊन माढा लोकसभा मतदारसंघातील दुष्काळाचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी दिल्लीत काम करणं गरजेचे आहे. असे देखील त्यांनी सांगितले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.