ETV Bharat / state

खासदार श्रीनिवास पाटलांनी गावच्या यात्रेत पाडला महिला कुस्तीचा पायंडा, पाहा व्हिडिओ... - मारु हवेली गावात महिला कुस्ती स्पर्धा बातमी

वाळवा तालुक्यातील इस्लामपूरची महाराष्ट्र चँपियन महिला कुस्तीपट्टू उज्ज्वला साळुंखे आणि इचलकरंजीची आर्या पाटील यांच्यात प्रेक्षणीय लढत झाली. उज्ज्वला साळुंखे हिने काही मिनिटात आर्या पाटील हिला चितपट केले. साक्षी पवार आणि ज्ञानेश्वरी पानस्कर यांच्यातील लढतीत साक्षी पवारने ज्ञानेश्वरीवर मात केली. महिलांची कुस्ती पाहण्यासाठी काही महिला, तरूणी देखील कुस्ती मैदानात उपस्थित होत्या.

mp srinivas patil laid the foundation of womens wrestling  at marul haveli village in satara district
खासदार श्रीनिवास पाटलांनी गावच्या यात्रेत पाडला महिला कुस्तीचा पायंडा
author img

By

Published : May 9, 2022, 12:19 PM IST

Updated : May 9, 2022, 1:20 PM IST

कराड (सातारा) - नंदादीप उत्सवाची दीर्घ परंपरा असणार्‍या पाटण तालुक्यातील मारूल हवेली गावच्या निनाईदेवी यात्रेनिमित्त दोन वर्षांनंतर यंदा जंगी कुस्त्यांचे मैदान झाले. यंदा प्रथमच महिलांच्या कुस्त्या आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे पंचक्रोशीतील शौकिनांनी कुस्त्या पाहण्यासाठी गर्दी केली होती. मारूल हवेली गावचे सुपूत्र, सिक्कीमचे माजी राज्यपाल आणि सातार्‍याचे खासदार श्रीनिवास पाटील ग्रामीण पेहरावात या मैदानाला उपस्थित होते. त्यांचे सुपूत्र, राष्ट्रवादीच्या माहिती, तंत्रज्ञान सेलचे प्रदेशाध्यक्ष तथा गावच्या यात्रा कमिटीचे अध्यक्ष सारंग पाटील यांच्या नियोजनाखाली झालेल्या कुस्ती मैदानात भरघोस बक्षिसांच्या कुस्त्या झाल्या.

खासदार श्रीनिवास पाटलांनी गावच्या यात्रेत पाडला महिला कुस्तीचा पायंडा

महिलांची प्रेक्षणीय कुस्ती लढत - वाळवा तालुक्यातील इस्लामपूरची महाराष्ट्र चँपियन महिला कुस्तीपट्टू उज्ज्वला साळुंखे आणि इचलकरंजीची आर्या पाटील यांच्यात प्रेक्षणीय लढत झाली. उज्ज्वला साळुंखे हिने काही मिनिटात आर्या पाटील हिला चितपट केले. साक्षी पवार आणि ज्ञानेश्वरी पानस्कर यांच्यातील लढतीत साक्षी पवारने ज्ञानेश्वरीवर मात केली. महिलांची कुस्ती पाहण्यासाठी काही महिला, तरूणी देखील कुस्ती मैदानात उपस्थित होत्या. विजेत्या पैलवानांना यात्रा कमिटीकडून रोख बक्षिसे देण्यात आली. तसेच खासदार श्रीनिवास पाटील आणि सारंग पाटील यांनी देखील रोख रकमेची बक्षिसे देऊन पैलवानांचे कौतुक केले. ईश्वरा पाटील यांनी निवेदन करताना मल्लांचा इतिहास आणि कुस्ती मैदानांमधील खुमासदार किस्से सांगून रंगत आणली.

Last Updated : May 9, 2022, 1:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.