सातारा: आमदार जयकुमार गोरे (MLA Jayakumar Gore) यांनी वडूज येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी त्यांनी अर्ज (Pre-arrest bail application) केला होता. वडूजचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.व्ही. हुद्दार यांनी तो फेटाळून लावला (Bail application rejected). सरकारी व बचाव पक्षाची बाजू ऐकूण आज न्यायालयाने निकाल दिला. मायणी येथील मृत भिसे यांची बोगस कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी आमदार जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडीबा घुटूगडे (रा. विरळी ता .माण), महेश पोपट बोराटे (रा. बिदाल ता. माण) व अज्ञात दोघांवर दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत महादेव पिराजी भिसे यांनी तक्रार दिली आहे. या पूर्वी या गुन्हात संजय काटकर याला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी मध्ये ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाची वडूज येथील सत्र न्यायालयाऐवजी अन्यत्र सुनावणी व्हावी यासाठी जिल्हा न्यायालयात आमदार गोरे यांनी धाव घेतली होती. हा अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला होता.
त्यामुळे वडूज न्यायालयातच गुरुवार दि.५ रोजी अटकपूर्व जामिनावर सुनावणी होणार होती. यावर दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने शुक्रवार दि.६ रोजी हा अटकपूर्व जामीन फेटाळला. सरकारी पक्षाच्यावतीने अॅड. मिलिंद ओक, आमदार जयकुमार गोरे यांच्यावतीने अॅड.हर्षद निंबाळकर तर मुळ फिर्यादीच्या बाजूने अॅड. टी.एस.माळी आणि अॅड. पी.डी.सावंत यांनी बाजू मांडली.
हेही वाचा : 'किसन वीर'चा निकाल; मदन भोसलेंना धक्का, मकरंद पाटलांनी उधळला विजयाचा गुलाल