ETV Bharat / state

पक्षी दिन विशेष : मायणी पक्षी अभयारण्य तांत्रिकतेच्या गर्तेत; मानवी हस्तक्षेपामुळे पक्षांचे आश्रयस्थान धोक्यात

मायणी तलाव परिसराचा उल्लेख सर्रास 'मायणी पक्षी अभयारण्य' असाच केला जातो. या बहूचर्चित अभयारण्याच्या संवर्धनावर शासन दरवर्षी किती खर्च करते, याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता मायणी हे पक्षांसाठी अभयारण्य कधीच नव्हते. त्याला अभयारण्याचा दर्जा नाही. ते अभयारण्य असल्याची कोणतीही नोंद अभिलेखामध्ये आढळत नाही, असा धक्कादायक खुलासा वनविभागाच्या वरिष्ठ सुत्रांनी केला आहे.

पक्षी
author img

By

Published : Nov 12, 2019, 11:43 AM IST

Updated : Nov 12, 2019, 12:44 PM IST

सातारा- पांढऱ्या रंगाच्या फ्लेमिंगोसह शेकडो परदेशी पाहुण्यांचा अधिवास असणारे जिल्ह्यातील मायणी पक्षी अभयारण्य तांत्रिकतेच्या गर्तेत अडकल्याने पर्यावरणीयदृष्ट्या दुर्दशेचे आगर बनले आहे. मायणीकडे परदेशी पाहुण्यांनी पाठ फिरवली आहे. वाढता मानवी हस्तक्षेप हेच या आत्मघाताचे कारण आहे. मायणीला अभयारण्याचा कधी दर्जा नव्हताच, असे तांत्रिक कारण सांगत वनविभागानेही हात वर केले आहेत.

माहिती देताना पर्यावरण तक्ष अजित (पापा) पाटील

आज १२ नोव्हेंबर, ज्येष्ठ पक्षी तज्ज्ञ डॉ. सलीम अली यांची जयंती. हा दिवस राष्ट्रीय पक्षी दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने 'ईटीव्ही भारत'च्या प्रस्तूत प्रतिनिधीने फ्लेमिंगोसह शेकडो परदेशी पाहुण्यांचे आश्रयस्थान असलेल्या जिल्ह्यातील मायणी (ता. खट‍ाव) तलावाची माहिती घेतली. मायणी तलाव परिसराचा उल्लेख सर्रास 'मायणी पक्षी अभयारण्य' असाच केला जातो. या बहूचर्चित अभयारण्याच्या संवर्धनावर शासन दरवर्षी किती खर्च करतो, याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता मायणी हे पक्षांसाठी अभयारण्य कधीच नव्हते. त्याला अभयारण्याचा दर्जा नाही. ते अभयारण्य असल्याची कोणतीही नोंद अभिलेखावर आढळत नाही, असा धक्कादायक खुलासा वनविभागाच्या वरिष्ठ सुत्रांनी केला आहे.

मायणी येथील ब्रिटीशकालीन तलावामुळे सांगली-सातारा जिल्ह्यातील शेकडो एकर क्षेत्र ओलिताखाली आले. दरवर्षी युरेशीयन डक, कॉमनकूट (वारकरी), पेन्टेड स्टार्क, नॉदर्न शावलर (थापट्या बदक), तसेच भारतीय पाणपक्षांमध्ये अडई, टिबुकली, विविध करकोचे, शेराटी, पानकावळा, तुतारी, नदीसुरय, कांडे, करकुचे, चक्रवाक, सारंग, डोम कावळे तसेच पर्यटकांचे खास आकर्षण असणारा फ्लेमिंगो (रोहित पक्षी) अशा विविध देशी-विदेशी पक्षांचे आगमन येथे होत होते. हा संपूर्ण परिसर पक्षांच्या किलबिलाटाने गजबजून जात असे.

हस्तक्षेपामुळे तलावात पाणी साठायचे बंद झाले

हा तलाव पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येतो. वनपाल व वनरक्षक अशा दोघांच्या भरवशावर शेकडो हेक्टर वनसंपदा आहे. अभयारण्याचा वैधानिक दर्जा नसल्याने या ठिकाणी शासनाकडून कोणत्याही विशेष निधीची तरतूद नाही. तसेच विशेष लक्षही दिले जात नाही. वाढता मानवी हस्तक्षेप रोखून पक्षांचा अधिवास जपण्यासाठीची कोणतीही उपाययोजना नाही. हस्तक्षेपामुळे तलावात पाणी साठायचे बंद झाले आहे.

विटा व इतर कारणांसाठी तलावातील मातीचा उपसा

मायणीत बेसुमार गाळाचे उत्खनन झाले. विटा व इतर कारणांसाठी या तलावातील गाळाची माती काढली गेली. वेडीबाभूळ व बेशरम या वनस्पतींच्या अतिक्रमणामुळे पक्षांना बसण्यासाठी जागा कमी पडू लागली. उथळ पाण्यामध्ये उंचवट्यांवर सुरक्षीत ठिकाणी हे पक्षी बसतात. उत्खननामुळे या पक्षांची आश्रयस्थाने धोक्यात आली. पाणी नसल्याने या पक्षांची अन्न साखळी धोक्यात आली. त्यामुळे फ्लेमिंगोंनी पाठ फिरवली.

मानवी हस्तक्षेप वेळीच रोखने गरजेचे

या परदेशी पानपक्षांना मायणीजवळच येराळवाडी तलाव परिसर सुरक्षित आश्रयस्थान वाटू लागले आहे. मायणी प्रमाणे येराळवाडी तलावात होऊ पहात असलेला मानवी हस्तक्षेप वेळीच रोखून या तलावास पक्षी अभियारण्याचा दर्जा द्यावा व तलाव संगोपन, संवर्धनासाठी उपाय योजावेत. अन्यथा, मायणी प्रमाणे येराळवाडी तलावाचा ऱ्हास होऊन देश-विदेशातील पक्ष‍ांचा येथील अधिवास संपुष्टात येण्याचा धोका आहे.

मायणीसह येराळवाडी पक्षी अभयारण्य विकसीत झाल्यास निसर्गपर्यटनाचे एक वेगळ ठिकाण निर्माण होईल. त्यातून निर्माण होणाऱ्या पक्षी निरीक्षण पर्यटनातून स्थानिकांचा शाश्‍वत विकास होण्यात निश्‍चीत हातभार लागेल. व लोकसहभागातून निसर्गरक्षणाचे काम साध्य करता येईल, असा विश्वास वाई येथील पक्षी निरीक्षक, अभ्यासक डॉ. जितेंद्र कात्रे यांनी व्यक्त केला.

मायणी वनक्षेत्र विशेष संरक्षित झाल्यास शासनाकडून स्वतंत्र निधी

"मायणी वनक्षेत्र विशेष संरक्षित झाल्यास त्याला शासनाकडून स्वतंत्र निधी, अधिक मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकेल. शिवाय, मायणी तलाव व परिसराच्या शाश्वत विकासासाठी शासन निर्देश देते. त्यामुळे स्थलांतरीत पक्षांचे हे आश्रयस्थान त्यांच्यासाठी अधिक सुरक्षित होईल, असे साताऱ्यातील उप वनसंरक्षक डाॅ. भारतसिंह हाडा यांनी सांगितले.

हेही वाचा- साताऱ्यात शेतकर्‍याची सतर्कता अन् पक्षीमित्रांमुळे जखमी करकोचाला जीवदान

Intro:शैलेन्द्र पाटील

सातारा : पांढऱ्या रंगाच्या-अग्निपंखाच्या फ्लेमिंगोसह शेकडो परदेशी पाहुण्यांचा अधिवास असणारे सातारा जिल्ह्यातील मायणी पक्षी अभयारण्य तांत्रिकतेच्या गर्तेत अडकल्याने पर्यावरणीयदृष्ट्या दुर्दशेचे आगर बनले आहे. मायणीकडे या परदेशी पाहुण्यांनी पाठ फिरवली आहे. वाढता मानवी हस्तक्षेप हेच या आत्मघाताचे कारण अाहे. मायणीला अभयारण्याचा दर्जा नव्हताच कधी असे तांत्रिक कारण सांगत वनविभागानेही हात वर केले आहेत. Body:आज १२ नोव्हेंबर, ज्येष्ठ पक्षी तज्ज्ञ डॉ. सलीम अली यांची जयंती. हा दिवस राष्ट्रीय पक्षी दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने 'ई टिव्ही भारत'च्या प्रस्तूत प्रतिनिधीने फ्लेमिंगोसह शेकडो परदेशी पाहुण्यांचे आश्रयस्थान असलेल्या सातारा जिल्ह्यातील मायणी (ता. खट‍ाव) तलावाची माहिती घेतली. मायणी तलाव परिसराचा उल्लेख सर्रास 'मायणी पक्षी अभयारण्य' असाच केला जातो. या बहूचर्चीत अभयारण्याच्या संवर्धनावर शासन दरवर्षी किती खर्च करते याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता मायणी हे पक्षांसाठी अभयारण्य कधीच नव्हते. त्याला अभयारण्याचा दर्जा नाही. ते अभयारण्य असल्याची कोणतीही नोंद अभिलेखावर आढळत नाही, असा धक्कादायक खुलासा वनविभागाच्या वरिष्ठ सुत्रांनी केला.

मायणी येथील या ब्रिटीशकालीन तलावामुळे सांगली-सातारा जिल्ह्यातील शेकडो एकर क्षेत्र ओलिताखाली आले. दरवर्षी युरेशीयन डक, कॉमनकुट (वारकरी), पेन्टेड स्टार्क, नॉदर्न शावलर (थापट्या बदक), तसेच भारतीय पाणपक्षांमध्ये अडई, टिबुकली, विविध करकोचे, शेराटी, पानकावळा, तुतारी, नदीसुरय, कांडे, करकुचे, चक्रवाक, सारंग, डोम कावळे तसेच पर्यटकांचे खास आकर्षण असणारा फ्लेमिंगो (रोहित पक्षी) अशा विविध देशी- विदेशी पक्षांचे आगमन येथे होत होते. हा संपूर्ण परिसर पक्षांच्या किलबिलाटाने गजबजून जात असे. हा तलाव पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येतो. वनपाल व वनरक्षक अशा दोघांच्या भरवशावर त्या सभोतीच्या शेकडो हेक्टर वनसंपदा आहे.

अभयारण्याचा वैधानिक दर्जा नसल्याने या ठिकाणी शासनाकडून कोणत्याही विशेष निधीची तरतूद नाही. तसेच विशेष लक्षही दिले जात नाही. वाढता मानवी हस्तक्षेप रोखून पक्षांचा अधिवास जपण्यासाठीची कोणतीही उपाययोजना नाही. हस्तक्षेपामुळे तलावात पाणी साठायचे बंद झाले आहे.

मायणीत बेसुमार गाळाचे उत्खनन झाले. विटा व इतर कारणांसाठी या तलावातील गाळाची माती काढली गेली. वेडीबाभूळ व बेशरम या वनस्पतींच्या अतिक्रमणामुळे पक्षांना बसण्यासाठी जागा कमी पडू लागली. उथळ पाण्यामध्ये उंचवट्यांवर सुरक्षीत ठिकाणी हे पक्षी बसतात. उत्खननामुळे या पक्षांची आश्रयस्थाने धोक्यात आली. पाणी नसल्याने या पक्षांची अन्न साखळी धोक्यात आली. त्यामुळे फ्लेमिंगोंनी पाठ फिरवली.

या परदेशी पानपक्षांना मायणीजवळच येराळवाडी तलाव परिसर सुरक्षित आश्रयस्थान वाटू लागले आहे. मायणी प्रमाणे येराळवाडी तलावात होऊ पहात असलेला मानवी हस्तक्षेप वेळीच रोखून या तलावास पक्षी अभयारण्याचा दर्जा द्यावा. व तलाव संगोपन, संवर्धनाचे उपाय योजावेत. अन्यथा मायणी प्रमाणे येराळवाडी तलावाचा -हास होऊन दुर्दशा पक्ष‍ांचा येथील अधिवास संपुष्टात येण्याचा धोका आहे.

"मायणीसह येराळवाडी पक्षी अभयारण्य विकसीत झाल्यास निसर्गपर्यटनाचे एक वेगळ ठिकाण निर्माण होईल. त्यातून निर्माण होणाऱ्या पक्षीनिरीक्षण पर्यटनातून स्थानिकांचा शाश्‍वत विकास होण्यात निश्‍चीत हातभार लागेल. व लोकसहभागातून निसर्गरक्षणाचे काम साध्य करता येईल," असा विश्वास वाई येथील पक्षी निरिक्षक, अभ्यासक डाॅ. जितेंद्र कात्रे यांनी व्यक्त केला.

कोट...

"मायणी वनक्षेत्र विशेष संरक्षित झाल्यास त्याला शासनाकडून स्वतंत्र निधी, अधिक मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकेल. शिवाय मायणी तलाव व परिसराच्या शाश्वत विकासासाठी शासन निर्देश देते. त्यामुळे स्थलांतरीत पक्षांचे हे आश्रयस्थान त्यांच्यासाठी अधिक सुरक्षित होईल."

डाॅ. भारतसिंह हाडा
उप वनसंरक्षक, सातारा.
--------------

फोटो कॅप्शन

खटाव (जि. सातारा) : मायणीजवळील येराळवाडी तलावाकडे फ्लेमिंगोसह शेकडो परदेशी पाहूण्यांनी आपला मोर्चा वळवला आहे. (छायाचित्र : सुधीर सुकाळे, सातारा)

-------------------------Conclusion:
Last Updated : Nov 12, 2019, 12:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.