ETV Bharat / state

Mangala Bansode on Gautami Patil: गौतमी पाटील प्रकरणावर कलावंत मंगला बनसोडेंचे आवाहन; म्हणाल्या, 'आपल्याच कलाकारांची हेटाळणी.. - गौतमी पाटीलचे व्हिडीओ व्हायरल

तमाशा सम्राज्ञी मंगला बनसाडे-करवडीकर यांनी गौतमी पाटील प्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे. महिला कलावंताचा असा व्हिडिओ काढून तो व्हायरल करणे निंदनीय असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच महाराष्ट्रातील आपल्याच कलावंताची हेटाळणी का करता? असा सवालही त्यांनी केला आहे.

Mangala Bansode reaction on Gautami Patil
मंगला बनसोडे
author img

By

Published : Mar 1, 2023, 9:03 PM IST

तमाशा कलावंत मंगला बनसोडे आवाहन करताना

सातारा: प्रसिध्दीच्या झोतात आलेल्या लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील हिचा ड्रेसिंग रूममधील व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर सर्वच क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत. महिला कलावंताचा असा व्हिडिओ काढून तो व्हायरल करणे निंदनीय असल्याचे सांगत प्रसिध्द लोककलावंत, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त तमाशा सम्राज्ञी मंगला बनसाडे-करवडीकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच महाराष्ट्रातील आपल्याच कलावंताची हेटाळणी का करता? असा सवालही त्यांनी केला आहे.

हा महाराष्ट्र आहे!: मंगला बनसोडे पुढे म्हणाल्या की, आपला महाराष्ट्र हा जिजाऊंचा, माता रमाबाई आणि सावित्रीबाईंचा आहे. युपी अथवा बिहार नाही. गौतमी पाटील ही महाराष्ट्रातील लोककलावंत आहे. ती आधी एक स्त्री आहे आणि मग कलावंत आहे. गौतमीच्या अश्लिल हावभावाच्या नृत्याबद्दल आपण आक्षेप घेतला. तो देखील बरोबर आहे. त्याबद्दल तिने माफीही मागितली. परंतु, ड्रेसिंग रुममध्ये कपडे बदलतानाचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करने हे निंदनीय आहे. कृपया असे करु नका, असे आवाहन तमाशा सम्राज्ञी मंगला बनसाडे यांनी केले आहे.

आपल्याच कलाकारांची हेटाळणी?: त्या पुढे म्हणाल्या की, परराज्यातून तसेच शेजारील देशांतून हिंदी चित्रपटातील कलाकार आपल्या महाराष्ट्रात आले. आपल्या पाच पिढ्या बसून खातील एवढा पैसा ते कमावून बसले आहेत. मग या आपल्या महाराष्ट्रात आपल्याच कलाकारांची आपण हेटाळणी का करताय, असा जळजळीत सवाल मंगला बनसोडे यांनी महाराष्ट्रातील तमाम लावणी आणि तमाशा रसिकांना केला आहे.

महिला आयोगाकडून गंभीर दखल: लावणी नृत्यांगणा गौतमी पाटीलचा एका कार्यक्रमात चेंजिंग रूममध्ये कपडे बदलतानाचा चोरून काढलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरला केल्याप्रकरणाची महिला आयोगाने गंभीर दखल घेतली. या प्रकरणात पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. महिलांच्या बाबतीत सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हे गुन्हे रोखण्याकरिता कृती कार्यक्रम जाहीर करावा, असे महिला आयोगाने पोलीस महासंचालकांना कळविले असल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.

सोशल मीडियावर नाराजी: गौतमी पाटीलचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावरही प्रतिक्रिया उमटत आहेत. गौतमी पाटील हिच्या नृत्याला विरोध असला तरी अशा प्रकारे बदनामीच्या हेतूने व्हिडीओ व्हायरल करणे चुकीचे आणि निंदनीय असल्याच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. वेगवेगळ्या माध्यमांतील कलावंतांनी या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून महाराष्ट्राच्या लोककलेच्या संस्कृतीची आठवण करून दिली आहे.

तीन पिढ्यांना राष्ट्रपती पुरस्कार: मंगला बनसाडे करवडीकर या महाराष्ट्रातील प्रसिध्द तमाशा लोककलावंत आहेत. आजोबा भाऊ मांग नारायणगावकर, आई विठाबाई यांच्यानंतर त्यांची मुलगी मंगला बनसाडे-करवडीकर अशा तीन पिढ्यांना लोककलेतील योगदानाबद्दल राष्ट्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. दिवंगत विठाबाई नारायणगावकर यांच्यासारख्या तमाशा सम्राज्ञींचा मोठा वारसा मंगला बनसोडे करवडीकरांना आहे.

हेही वाचा: Gautami Patil : चर्चा तर होणारच! चिमुकल्याच्या वाढदिवसाला वडिलांनी ठेवला गौतमी पाटीलच्या लावण्यांचा कार्यक्रम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.