ETV Bharat / state

मलकापूर अखेर कोरोनामुक्त; नगरपालिकेच्या प्रयत्नांना यश - Malakapur covid 19

मलकापूरमधील आगाशिवनगर, अहिल्यानगर आणि विश्रामनगर या भागामध्ये 21 एप्रिल रोजी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनाही प्रादुर्भाव झाल्यामुळे मलकापूरमधील बाधितांची संख्या 26 वर गेली होती.

Malakapur council
मलकापूर नगरपंचायत
author img

By

Published : Jun 3, 2020, 8:23 AM IST

कराड (सातारा) - कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या आणि कोरानाबाधित रूग्णांची साखळी वाढलेल्या मलकापूरमधील सर्व रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नगरपालिकेने केलेल्या प्रयत्नांना यश आले असल्याची प्रतिक्रिया मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे आणि उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली.

मलकापूरमधील आगाशिवनगर, अहिल्यानगर आणि विश्रामनगर या भागामध्ये 21 एप्रिल रोजी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनाही प्रादुर्भाव झाल्यामुळे मलकापूरमधील बाधितांची संख्या 26 वर गेली होती. त्यामुळे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी शेखर सिंह, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी मलकापूरला भेट दिली होती.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून शहरातील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले होते. त्यानुसार मलकापूर नगरपालिकेने 104 कर्मचार्‍यांची नियुक्ती केली होती. शासनाच्या आरोग्य विभागाच्या
आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनिसही त्यामध्ये सहभागी होत्या. जिल्हा परिषदेने थर्मलस्क्रिनिंग गन व ऑक्सिपल्स मिटर उपलब्ध करुन दिले. नागरिकांचे लॉटने सर्व्हेक्षण व स्वॅब टेस्ट करण्यात आल्या. त्यामुळे कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखणे शक्य झाल्याचे नगराध्यक्षा आणि उपनगराध्यक्षांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.