ETV Bharat / state

...आता जिल्ह्यात रुग्णालयातील खाटांच्या उपलब्धतेची माहिती मिळणार 'या' लिंकवर

author img

By

Published : Sep 30, 2020, 7:12 PM IST

सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते या रुग्ण व्यवस्थापन प्रणालीचे मंत्रालयात ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. ही केंद्रीय रुग्ण व्यवस्थापन प्रणाली असून covid19satara.in या लिंकद्वारे रुग्णालयातील खाटांची माहिती उपलब्ध होणार आहे.

माहिती मिळणार 'या' लिंकवर
माहिती मिळणार 'या' लिंकवर

सातारा - जिल्ह्यातील सर्व कोविड-19 रुग्णांसाठी केंद्रीय रुग्ण व्यवस्थापन प्रणाली सुरू झाली आहे. जिल्ह्यातील रुग्णालयातील खाटांच्या उपलब्धतेची माहिती http://covid19satara.in/ या लिंकवर मिळणार आहे.

सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते या रुग्ण व्यवस्थापन प्रणालीचे मंत्रालयात ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना पाटील म्हणाले, सातारा जिल्ह्यातील कोरोनामुळे होणारा मृत्युदर कमी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत. ही केंद्रीय रुग्ण व्यवस्थापन प्रणाली असून covid19satara.in या लिंकद्वारे रुग्णालयातील खाटांची माहिती उपलब्ध होणार आहे. एखाद्या तालुक्यात खाट उपलब्ध नसेल तर दुसऱ्या तालुक्याच्या ठिकाणी रुग्णालयात खाट उपलब्ध आहे का नाही, याची माहिती मिळू शकते. तसेच, खाटेआभावी उपचार न मिळण्याच्या अडचणी दूर होण्यासही मदत होईल. यावेळी कोरी रोशन सोल्युशन एलएलपीचे व्यवस्थापकीय संचालक मोहित तोडकर यांनी याचे सादरीकरण केले. याबद्दल काही अडचण आली तर टोल फ्री क्रमांक 1077 हा सुध्दा उपलब्ध करून देण्यात आल असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

हेही वाचा - शेतघरातील चाळीतून २० क्विंटल कांदा चोरीला : सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.