कला, संस्कृती, साहित्य अशा विविध अष्टपैलूंनी नटलेल्या 'आय लव्ह पाचगणी फेस्टिव्हल'चा उत्साह शिगेला - आय लव्ह पाचगणी फेस्टिव्हल २०१९
पाचगणीत येत्या 29, 30 नोव्हेंबर व १ डिसेंबरला कै. भाऊसाहेब भिलारे, क्रीडाभूमी येथे 'आय लव्ह पाचगणी फेस्टिव्हल' चे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय सोहळ्याचे उद्घाटन शुक्रवारी रोटरी विभाग 3132 चे प्रांतपाल सुहास वैद्य तसेच 'अगं बाई सासूबाई' फेम गिरीश ओक व कौशल इमानदार यांच्या उपस्थितीत केले जाईल. त्यानंतर नृत्य, गायन व कलागुणांचा कार्यक्रम पार पडणार आहे.
सातारा - जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या पाचगणी येथे 'आय लव्ह पाचगणी' या तीन दिवसीय सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी अनेक सामाजिक संस्था तसेच शिक्षण संस्था यात भाग घेऊन हा सोहळा साजरा करणार असून याच्या उद्घाटनाला विविध अभिनेत्यांची उपस्थिती असणार आहे.
पाचगणीत येत्या 29, 30 नोव्हेंबर व १ डिसेंबरला कै. भाऊसाहेब भिलारे, क्रीडाभूमी येथे 'आय लव्ह पाचगणी फेस्टिव्हल' चे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय सोहळ्याचे उद्घाटन शुक्रवारी रोटरी विभाग 3132 चे प्रांतपाल सुहास वैद्य तसेच 'अगं बाई सासूबाई' फेम गिरीश ओक व कौशल इमानदार यांच्या उपस्थितीत केले जाईल. त्यानंतर नृत्य, गायन व कलागुणांचा कार्यक्रम पार पडणार आहे.
हेही वाचा - उड्डाणपुलासाठी कराडमधील हजारो विद्यार्थ्यांनी केली प्रार्थना
या सोहळ्यातील तिन्ही दिवशी सायंकाळी ७ पासून आगळी वेगळी मेजवानी देणाऱ्या वॉकिंग प्लाझाचे व वाद्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन शिवाजी चौक व बाजारपेठेत करण्यात आले आहे. यात आर्ट क्राफ्ट प्रदर्शनांतर्गत पाचगणी क्लब येथे विंटेज कार व जुन्या मोटोरबाईकचे प्रदर्शन, शिल्प कलेचे दर्शन होणार असून दुर्मिळ व अनमोल चित्र पाहवयास मिळणार आहेत. पाचगणी क्लब येथे पहिल्या दिवसापासून सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे. तसेच टाऊन हॉल येथे रंगावली प्रदर्शनाचे आयोजन करणयात आले आहे.
इंटरनॅशनल काईट फेस्टिव्हल
शनिवारी आणि रविवारी सकाळी १० ते रात्री १० पर्यंत आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे पठार म्हणून नावलौकिक असलेल्या टेबललँड येथे निरभ्र आकाशात इंटरनॅशनल काईट फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रंगीबेरंगी, विविध आकाराच्या स्वच्छंद विहार करणाऱ्या पतंग उपस्थितांना वेगळ्या विश्वात नेतील. माला हॉटेल्स येथे सायंकाळी चारपासून झुंबा डान्स, छत्रपती शिवाजी चौकात साडे चार वाजता मलखांब तसेच महिला व पुरुषांचा सहभाग असलेली रस्सी खेच अर्थात 'टग ऑफ वॉर' स्पर्धा होईल. त्यानंतर रविवारी सकाळी ट्रेजर हंटचा न्यारा आनंद मिळणार आहे. समारोपाच्या दिवशी पुरस्कारांची खैरात करणाऱ्या लकी ड्रॉ व वॉकींग प्लाझाला लाईव्ह बँडची अजोड साथ मिळणार आहे.
हेही वाचा - भाजप गतिमान व स्थिर सरकार देईल - शिवेंद्रराजे भोसले
या साेहळ्या निमित्त 'आय लव्ह पाचगणी फेस्टिव्हल' येत्या 29,30 नोव्हेंबर व 1 डिसेंबरमध्ये पार पडणार आहे. यावेळी अनेक सामाजिक संस्था तसेच शिक्षण संस्था यात भाग घेऊन हा फेस्टिव्हल साजरा करणार आहेत.
Body:अभिनेत्यांची उदघाटन साेहळ्यास उपस्थिती
येत्या 29 , 30 नोव्हेंबर व एक डिसेंबरला असे तीन दिवस हा सोहळा हाेणार आहे. शुक्रवारी (ता. 29) (कै.) भाऊसाहेब भिलारे क्रीडाभूमी येथे नृत्य, गायन व कलागुणांचा कार्यक्रम हाेईल. त्याचे उदघाटन रोटरी विभाग 3132 चे प्रांतपाल सुहास वैद्य तसेच अगं बाई सासूबाई फेम गिरीश ओक व कौशल इमानदार यांच्या उपस्थित हाेईल.
वॉकिंग प्लाझा, विंटेज कार, मोटोरबाईक आदींचे प्रदर्शन
या तिन्ही दिवशी सायंकाळी सातपासून आगळी वेगळी मेजवानी देणाऱ्या वॉकिंग प्लाझाचे व वाद्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन शिवाजी चौक व बाजारपेठेत करण्यात आले आहे.
आर्ट क्राफ्ट प्रदर्शना अंतर्गत पाचगणी क्लब येथे विंटेज कार व जुन्या मोटोरबाईकचे प्रदर्शन , शिल्प कलेचे दर्शन होणार असून दुर्मिळ व अनमोल चित्र पाहवयास मिळणार आहेत.
पाचगणी क्लब येथे पहिल्या दिवसापासून सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे. टाऊन
हॉल येथे रंगावली प्रदर्शनाचे आयोजन करणयात आले आहे.
इंटरनॅशनल काईट फेस्टिव्हल
शनिवारी (ता.29) व रविवारी (ता. 30) सकाळी 10 ते
रात्री 10.00 पर्यंत आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे पठार म्हणून नावलौकिक असलेल्या टेबललँड येथे निरभ्र आकाशात इंटरनॅशनल काईट फेस्टिव्हलचे आयाेजन करण्यात आले आहे. याध्ये रंगीबेरंगी, विविध आकाराच्या स्वचंद विहार करणाऱ्या पतंग उपस्थितांना वेगळ्या विश्वात नेतील.
माला हॉटेल्स येथे सायंकाळी चारपासून झुंबा डान्स, छत्रपती शिवाजी चौकात साडे चार वाजता मलखांब तसेच महिला व पुरुषांचा सहभाग असलेली रस्सी खेच अर्थात 'टग ऑफ वॉर' स्पर्धा हाेईल.
रविवारी सकाळी ट्रेजर हंटचा न्यारा आनंद मिळणार आहे. समाराेपाच्या दिवशी पुरस्कारांची खैरात करणाऱ्या लकी ड्रॉ व वॉकींग प्लाझाला लाईव्ह बँडची अजोड साथ मिळणार आहे.Conclusion: