ETV Bharat / state

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सहा दिवस जोरदार पाऊस, धरणात 76.7 टीएमसी पाणीसाठा

पाटणसह कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सलग सहा दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सहा दिवस जोरदार पाऊस, धरणात 76.7 टीएमसी पाणीसाठा
author img

By

Published : Aug 1, 2019, 10:23 AM IST

Updated : Aug 1, 2019, 12:11 PM IST

सातारा - पाटणसह कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सलग सहा दिवसांपासून जोरदार अतिवृष्टी सुरू आहे. जलाशयात तब्बल 54 हजार 21 क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक सुरू आहे. कोयना, नवजा व महाबळेश्वर येथील पावसाने 3 हजार मिलीमीटरचा टप्पा ओलांडला आहे. धरणात 76.7 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या सहा वक्र दरवाजाला पाणी टेकले आहे. धरणातील जलाशय परिचालन सूचीनुसार निर्धारित जलपातळी राखण्यासाठी आज सकाळी 8 वाजल्यापासून कोयना धरणाच्या पायथा वीज गृहातून 2 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येणार असल्याची माहिती कोयना धरणाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली.

चोवीस तासात शिवाजीसागर जलाशयात 3.81 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. चोवीस तासात नवजा येथे सर्वाधिक 262 आणि कोयनात 341 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असणारे कोयना धरण 76.7 टक्के भरले आहे. संगमनगर (धक्का), निसरे येथील कोयनानदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने दळणवळण ठप्प झाले आहे. गुजरवाडी घाटात रस्त्यावर दरड कोसळल्याने पाटण-गुजरवाडी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. जेसीबीच्या साहाय्याने दरड बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

पाटणसह कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सलग सहा दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मंगळवारी सायंकाळी 5 ते बुधवारी सायंकाळी 5 पर्यंत कोयनानगर येथे 341 (3269), नवजा 262 (3807) व महाबळेश्वर 253 (3200) मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पाणीपातळी 2136 फूट 09 इंच, 651.281 मीटर इतकी झाली आहे. सध्या धरणात 54 हजार 21 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. धरणातील पाणीसाठा 76.07 टीएमसी एवढा झालेला आहे. मागील वर्षी याच तारखेला जलाशयात 85.89 टीएमसी होता तो आजच्या घडीला तब्बल 9.82 टीएमसीने कमी आहे. सध्या धरणात येणाऱ्या पाण्याची आवक पाहता धरणातील पाणी साठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोयना धरणातून 2 हजार 100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील पर्जन्यमानानुसार यथावकाश सांडव्यावरूनही पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे.

कोयना पाणलोट क्षेत्रातील अतिपर्जन्यमान असलेल्या ठिकाणीही धुव्वाधार पर्जन्यवृष्टी होत असून प्रतापगड 35 (3137), सोनाट 45 (2665), वळवण 42 (3338), बामणोली 39 (2291), काठी 29 (2417) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाटण तालुक्यातील विविध विभागातही धुव्वाधार पावसाची बरसात होत आहे. मंगळवारी दिवसभर जोरदार पावसाची रिपरिप सुरू होती. कोयना व केरा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. कोयना विभागातील संगमनगर (धक्का) येथील जुना पूल व निसरे येथील पूल पाण्याखाली गेले आहेत.

कोयना नदीकाठावरील गावांना अतिदक्षतेचा इशारा -

कोयना धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याने धरणाच्या खाल्याच्या भागातील नदीकाठची गावे, वाड्यावस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव नदीपात्रात प्रवेश करू नये. वीज, मोटारी, इंजिन, शेती अवजारे अथवा तत्सम साहित्य पशुधन यांच्याही सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Intro:सातारा:- पाटणसह कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सलग सहा दिवसांपासून संततधार जोरदार अतिवृष्टी सुरू असून जलाशयात तब्बल 54 हजार 21 क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक सुरू आहे. कोयना, नवजा व महाबळेश्वर येथील पावसाने 3 हजार मिलीमीटरचा टप्पा ओलांडला आहे. धरणात 76.7 टीएमसी पाणीसाठा झाला असून धरणाच्या सहा वक्र दरवाजाला पाणी टेकले आहे. धरणातील जलाशय परिचालन सुचीनुसार निर्धारीत जलपातळी राखण्यासाठी आज सकाळी 8 वाजल्यापासून कोयना धरणाच्या पायथा वीज गृहातून 2 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येणार असल्याची माहिती कोयना धरणाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली.

Body:दरम्यान, गेल्या चोवीस तासात शिवाजीसागर जलाशयात 3.81 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. चोवीस तासात नवजा येथे सर्वाधिक 262, कोयना 341 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असणारे कोयना धरण 76.7 टक्के भरले आहे. तर संगमनगर (धक्का), निसरे येथील कोयनानदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने दळणवळण ठप्प झाले आहे. तर गुजरवाडी घाटात रस्त्यावर दरड कोसळल्याने पाटण-गुजरवाडी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. जेसीबीच्या सहाय्याने दरड बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

पाटणसह कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सलग सहा दिवसांपासून संततधार मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत. मंगळवार दि. 29 रोजी सायंकाळी 5 ते बुधवारी सायंकाळी 5 पर्यंत कोयनानगर येथे 341 (3269), नवजा 262 (3807) व महाबळेश्वर 253 (3200) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर पाणीपातळी 2136 फूट 09 इंच, 651.281 मीटर इतकी झाली आहे. सध्या धरणात 54 हजार 21 क्युसेक्स पाण्याची आवक होत असून धरणातील पाणीसाठा 76.07 टीएमसी एवढा झालेला आहे. मागील वर्षी याच तारखेला जलाशयात 85.89 टीएमसी होता तो आजच्या घडीला तब्बल 9.82 टीएमसीने कमी आहे. सध्या धरणात येणाऱ्या पाण्याची आवक पाहता धरणातील पाणी साठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोयना धरणातून 2 हजार 100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील पर्जन्यमानानुसार यथावकाश सांडव्यावरूनही पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे.

कोयना पाणलोट क्षेत्रातील अतीपर्जन्यमान असलेल्या ठिकाणीही धुव्वॉंधार पर्जन्यवृष्टी होत असून प्रतापगड 35 (3137), सोनाट 45 (2665), वळवण 42 (3338), बामणोली 39 (2291), काठी 29 (2417) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर पाटण तालुक्यातील विविध विभागातही धुव्वॉंधार पावसाची बरसत होत असून मंगळवारी दिवसभर जोरदार पावसाची रिपरिप सुरू होती. कोयना व केरा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. कोयना विभागातील संगमनगर (धक्का) येथील जुना पूल व निसरे येथील पूल पाण्याखाली गेले आहेत.

(कोयना नदीकाठावरील गावांना अतिदक्षतेचा इशारा
कोयना धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याने धरणाच्या खालील भागातील नदीकाठची गावे, वाड्यावस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरीकांनी सुरक्षेच्या कारणास्तव नदीपात्रात प्रवेश करू नये. वीज, मोटारी, इंजिने, शेती अवजारे अथवा तत्सम साहित्य पशुधन यांच्याही सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.)Conclusion:
Last Updated : Aug 1, 2019, 12:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.