ETV Bharat / state

मराठा आरक्षणाबाबत राज्यपालांनी लक्ष घालावे; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर - वीज बिल माफी द्यावी

भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाबाबत आपण लक्ष घालावे व मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी आग्रही मागणी केली.

Ranjit Singh Naik Nimbalkar
रणजितसिंह नाईक निंबाळकर
author img

By

Published : Dec 3, 2020, 3:30 PM IST

सातारा : सध्या राज्यामध्ये मराठा आरक्षणावरून रान पेटले असताना माढ्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाबाबत आपण लक्ष घालावे व मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी आग्रही मागणी केली.

खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात विविध विषयांसाठी भेट घेतली. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मराठा आरक्षणाबाबत लक्ष घालून मराठा समाजातील बांधवांना आरक्षण व सद्य स्थितीत विविध सवलती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी परखड भूमिका नाईक-निंबाळकर यांनी मांडली.

हेही वाचा - मालेगाव स्फोट : साध्वी प्रज्ञासिंहसह सर्व आरोपींना 19 डिसेंबरला न्यायालयात हजर करण्याचे निर्देश

युवकांपुढे आरक्षणावीना अडचणी

मराठा समाजातील युवकांचे बरेच प्रश्न अतिशय जटिल बनले असून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना युवकांना नोकरी मिळवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मराठा समाजातील अनेक युवकांना शिक्षणापासून व उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण अत्यंत महत्त्वाचे असून याबाबत आपण स्वतः पाठपुरावा करून मराठा आरक्षण मिळण्याबाबत प्रयत्न करावेत, असेही खासदार निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देताना राज्यातील सद्यस्थितीत असणाऱ्या कोणत्याही समाजाचे आरक्षण काढून न घेता मराठा समाजाला स्वतंत्र रीत्या आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी मराठा समाजातील सर्वच नेते मंडळी करीत आहेत. याउलट ज्या इतर समाजातील नेते मंडळी मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत आग्रही आहेत, त्यांचाही पाठिंबा घेऊन मराठा समाजाला आरक्षण देणे गरजेचे आहे, असेही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या निदर्शनास आणून दिले.

हेही वाचा - राज्यातील चार वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुरू होणार अतिविशेषोपचार रुग्णालय

वीज बिल माफी द्यावी

सध्य स्थितीला राज्यात असणाऱ्या महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांचे व सर्वसामान्य जनतेचे अतिशय हाल लावले असून आगामी काळात महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांचे व सर्वसामान्य जनतेची लाईट बिले माफ करून लॉकडाऊनमध्ये झालेल्या त्रासाबाबत विज बिल माफी द्यावी व त्याबाबत आपल्या मार्फत महाविकास आघाडीच्या सरकारला पाठपुरावा करण्यात यावा अशीही मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राज्यपालांकडे केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.