ETV Bharat / state

Students Stranded In Ukraine : युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचा खर्च सरकारने करावा -पृथ्वीराज चव्हाण

रशिया आणि युक्रेनमध्ये युध्द सुरू आहे. युध्दजन्य परिस्थितीमुळे महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. (Students Stranded In Ukraine) भारत सरकार या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याचे प्रयत्न करत आहे. अनेक विद्यार्थी परतले देखील आहेत. परंतु, अजुन बरेच विद्यार्थी युक्रेनच्या सीमेवर तसेच नजीकच्या राष्ट्रांमध्ये अडकले आहेत. या विद्यार्थ्यांच्या विमान भाड्याचा खर्च महाराष्ट्र सरकारने उचलावा, असे आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.

पृथ्वीराज चव्हाण
पृथ्वीराज चव्हाण
author img

By

Published : Mar 1, 2022, 1:48 PM IST

सातारा (कराड) - महाराष्ट्रातील २ हजारहून अधिक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असल्याचा अंदाज आहे. (Prithviraj Chavan on Ukraine) या विद्यार्थ्यांसाठी शेजारील देशांतून भारताकडे येणाऱ्या एकेरी विमान भाड्याचा खर्च महाराष्ट्र सरकारने उचलावा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांचे ट्विट
पृथ्वीराज चव्हाण यांचे ट्विट

युक्रेन सीमेवर विद्यार्थ्यांचे हाल

युक्रेनमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी अडकले आहेत. युध्दामुळे विद्यार्थ्यांचे राहण्याचे आणि जेवणाचे हाल होत आहेत. हे विद्यार्थी कसेबसे युक्रेनच्या सीमेवर पोहोचत आहेत. (Students Stranded In Ukraine) त्यांच्या जेवणाचे आणि राहण्याचे हाल होत आहेत. शेजारील देशांमध्ये आसरा घेऊन ते भारतात येत आहेत. त्यांच्या विमान भाड्याचा खर्च महाराष्ट्र सरकारने उचलावा, असे ट्विट पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.

युक्रेनमधून बाहेर पडण्याची धडपड

रशिया आणि युक्रेनमध्ये युध्द सुरू आहे. युध्दजन्य परिस्थितीमुळे महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. भारत सरकार या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याचे प्रयत्न करत आहे. अनेक विद्यार्थी परतले देखील आहेत. परंतु, अजुन बरेच विद्यार्थी युक्रेनच्या सीमेवर तसेच नजीकच्या राष्ट्रांमध्ये अडकले आहेत. युध्दामुळे विद्यार्थी भयभीत असून त्यांचे पालकही काळजीत आहेत. युक्रेनमधील विद्यार्थी सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला मायदेशात नेण्यात यावे, अशी आर्जव करत आहेत. युक्रेनमधून बाहेर पडण्याची त्यांची धडपड सुरू आहे. या धावपळीत विद्यार्थ्यांच्या खाण्या-पिण्याची आबाळ झाली आहे. त्यांना नीट झोप मिळालेली नाही. तसेच, व्यवस्थित अन्नही मिळालेले नाही. या विद्यार्थ्यांच्या विमान भाड्याचा खर्च महाराष्ट्र सरकारने उचलावा, असे आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.

हेही वाचा - उद्याच्या उद्या सुनावणी का व्हावी? यासाठी उच्च न्यायालयाने नवाब मलिकांकडे मागितले स्पष्टीकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.