ETV Bharat / state

Respect for widows : सातार्‍यातील किरकसालचे माजी सरपंच आपल्या मुलीच्या लग्नात हळदीचा पहिला मान देणार विधवा महिलांना - Satara

विधवा प्रथा बंदीचा केवळ ठराव घेऊन न थांबता ग्रामसभेतच विधवा महिलांना हळदी कुंकू लावून तसेच हिरवा चुडा भरून ठरावाची प्रत्यक्ष कार्यवाही सातारा ( Satara ) जिल्ह्यातील माण तालुक्यातील किरकसाल गावाने केली आहे. येथील सरपंच आपल्या मुलीच्या लग्नात हळदीचा पहिला मान विधवा महिलांना ( Respect For Widows ) देणार आहेत.

Respect for widows
Respect for widows
author img

By

Published : Jun 12, 2022, 4:18 PM IST

सातारा - विधवा प्रथा बंदीचा केवळ ठराव घेऊन न थांबता ग्रामसभेतच विधवा महिलांना हळदी कुंकू लावून तसेच हिरवा चुडा भरून ठरावाची प्रत्यक्ष कार्यवाही माण तालुक्यातील किरकसाल गावाने केली आहे. तसेच आपल्या मुलीच्या लग्नात हळदीचा पहिला मान विधवा महिलांना देणार असल्याची शपथ माजी सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते अमोल काटकर यांनी ग्रामसभेत घेतली.

ग्रामसभेत ठराव, तातडीने कार्यवाही - किरकसाल ग्रामपंचायतीने सरपंच शोभा कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन केले होते. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी डी. बी. भोसले, माजी सरपंच अमोल काटकर, पोलीस पाटील दत्तात्रय रसाळ, उमेद अभियानाच्या समन्वयक दीपाली मासाळ, कृषी सहाय्यक प्राची निकाळजे, सुनील काटकर, निवृत्ती काटकर, ग्रामसेवक विकास गायकवाड उपस्थित होते. अमोल काटकर यांनी विधवा प्रथाबंदीचा ठराव मांडला. उपस्थितांनी त्याला एकमताने संमती दिली. तसेच सरपंच शोभा कुंभार यांनी विधवा महिलांना हळदी-कुंकू लावत हिरव्या बांगड्या भरल्या. पती निधनानंतर पहिल्यांदाच कपाळावर कुंकवाचा टिळा लावून घेताना महिला भावूक झाल्या होत्या. भावनिक वातावरणाने सर्वांच्याच डोळ्यांच्या कडा पाणावल्या.

विधवांना आदराचे स्थान देण्याची शपथ - विधवा महिलांना सर्व समारंभामध्ये सामावून घेऊन त्यांना आदराचे स्थान देण्याची शपथ ग्रामसभेत घेण्यात आली. शासनाने 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून विधवा महिलांच्या विकासासाठी तरतूद करावी, अशी मागणी सहाय्यक गटविकास अधिकारी डी. बी. भोसले यांनी केली. माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते अमोल काटकर यांनी आपल्या मुलीच्या लग्नात हळदी लावण्याचा पहिला मान विधवा महिलांना देणार असल्याचे ग्रामसभेत जाहीरपणे सांगितले. विधवा महिलांना समाजात मानसन्मान मिळणार असल्याचे खूप समाधान आहे. ग्रामसभेत फक्त निर्णय घेऊन थांबलो नाही तर प्रत्यक्ष कृती करून किरकसाल गाव विधवा प्रथामुक्त केल्याचा अभिमान आहे. यापुढेही सर्व ग्रामस्थ कृतीशील राहतील, अशी ग्वाही सरपंच शोभा कुंभार यांनी दिली.

हेही वाचा - Uddhav Thackeray : राष्ट्रपतीपद निवडणूक.. ममता बॅनर्जींची बैठक.. उद्धव ठाकरे फिरवणार पाठ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.