ETV Bharat / state

देशभरात अग्नीपथ योजनेला विरोध, साताऱ्यातील 'या' गावाने दिला पाठिंबा - Apshinge Village

सातार्‍यातील मिलिटरी अपशिंगे गावातील माजी सैनिकांनी अग्निपथ भरती योजनेला पाठिंबा दिला आहे. अग्निपथ योजनेमुळे तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील. तसेच तरुणांसाठी अनेक मार्ग खुले होतील, असे माजी सैनिकांचे म्हणणे आहे.

अग्नीपथ
अग्नीपथ
author img

By

Published : Jun 19, 2022, 12:37 PM IST

सातारा - केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला देशभर हिंसक निदर्शनाच्या माध्यमातून विरोध होत आहे. मात्र, सातार्‍यातील मिलिटरी अपशिंगे गावातील माजी सैनिकांनी या भरती योजनेला पाठिंबा दिला आहे. अग्निपथ योजनेमुळे तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील. तसेच तरूणांसाठी अनेक मार्ग खुले होतील, असे माजी सैनिकांचे म्हणणे आहे.

बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यास होईल मदत - सातार्‍यापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या मिलिटरी अपशिंगे गावाला लष्करी सेवेची परंपरा आहे. गावच्या प्रत्येक घरातील एकजण सैन्य दलाच्या सेवेत आहे. सशस्त्र दलात भरती होऊ इच्छिणार्‍या तरुणांशी माजी सैनिक संपर्क साधून त्यांना अग्निपथ योजनेबद्दल मार्गदर्शन करत आहेत. अग्निपथ योजनेला विरोध सुरू असला तरी, आम्ही सकारात्मक आहोत. अधिकाधिक तरुणांना सशस्त्र दलात सामील करून घेतले जाईल. तसेच तरूणांना अधिक संधी मिळतील. बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यास मदत होईल, असा विश्वास वाटत असल्याचे निवृत्त सुभेदार सुधीर कारंडे यांनी सांगितले.

क्षमता असणारे जातील पुढे - अग्निपथ योजना चांगली आहे. ज्यांच्याकडे क्षमता आहे ते सैन्यात पुढे जाऊ शकतात. जे 25 टक्क्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत, त्यांच्यासाठी चार वर्षांच्या सेवेनंतर मुख्य प्रवाहात सामील होण्याचे अनेक मार्ग उघडतील, असे निवृत्त सुभेदार संदीप निकम म्हणाले. सुभेदार निकम हे 2020 मध्ये सैन्य दलातून निवृत्त झाले आहेत. सैन्य दलात भरती होऊ इच्छिणार्‍या तरुणांना ते मार्गदर्शन करत आहेत. तसेच अग्निपथ योजनेबद्दलची माहिती देत आहेत.

कसे पडले मिलिटरी अपशिंगे नाव..? - अपशिंगे गावाचे मिलिटरी अपशिंगे नामकरण करण्यामागे पहिल्या महायुद्धाचा इतिहास आहे. 1914 ते 1919 या काळात अपशिंगे गावातील 46 जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. त्यामुळे तत्कालिन ब्रिटिश सरकारने या गावाला अपशिंगे मिलिटरी, असे नाव देऊन सन्मान केला. स्वातंत्र्यपूर्व काळात सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतही अपशिंगे गावातील चौघांचा सहभाग होता.

हेही वाचा - MBBS student suicide : कराडमध्ये शिक्षण घेणार्‍या एमबीबीएसच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.