मुंबई : मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपी फरार झाला होता. सैफवर धारदार शस्त्रानं हल्ला करणाऱ्या आरोपीला 30 तासांहून अधिक काळपासून पोलीस शोधत होती. आता या संशयित आरोपीला अटक झाली असून त्याची चौकशी केली जाणार आहे. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये तो निर्भय असल्याचा दिसत आहे. या आरोपीला पोलिसांनी पकडले, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर थोडी देखील भीती नव्हती. आता या संशयित आरोपीला वांद्रे पोलीस ठाण्यात नेले गेले आहे. अटक केलेली व्यक्ती तीच व्यक्ती आहे की नाही याची अद्याप पुष्टी झालेली नाही. सैफवरील हल्ल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी संशयिताला पकडण्यासाठी 35 पथके तैनात केली होती.
सैफ अली खानवर कसा झाला हल्ला : मिळालेल्या माहितीनुसार सैफ अली खानवर जेव्हा हल्ला झाला, त्यावेळी करीना कपूर आणि त्यांची दोन मुले देखील तिथे उपस्थित होती. याशिवाय यावेळी पाच घरकाम करणारे नोकर देखील तिथे होते. गुरुवारी रात्री 1.30 वाजताच्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती सैफ अली खानच्या घरात घुसली होती. यानंतर सैफच्या घरी काम करत असणारी नैनीला बाथरूमकडे एक सावली दिसली. आधी या नैनीला वाटलं की, करीना आपला छोटा मुलगा जहांगीरला पाहण्यासाठी आली असेल. मात्र यानंतर नैनीला शंका आली, या व्यक्तीनं अचानक नैनीवर हल्ला केला. या चोरानं म्हटलं, "जर आवाज केला तर मी तुला मारून टाकीन." यानंतर नैनी विचारलं की, "तुम्हाला काय पाहिजे आहे ?" यावर या चोरानं उत्तर दिली की, "1 कोटी रुपये." लगेच हा चोर मोलकरणीवर चाकूनं हल्ला करतो. यावर ती ओरडा करते. ओरडण्याचा आवाज ऐकून सैफ अली खान रुममधून बाहेर येतो.
#WATCH | Saif Ali Khan Attack Case | Mumbai Police bring one person to Bandra Police station for questioning.
— ANI (@ANI) January 17, 2025
Latest Visuals pic.twitter.com/fuJX9WY7W0
VIDEO | Attack on Saif Ali Khan: CCTV footage shows the alleged attacker fleeing the building through staircase.
— Press Trust of India (@PTI_News) January 16, 2025
(Source: Third Party)#SaifAliKhanInjured pic.twitter.com/VHpAenxFdu
सैफची प्रकृती ठीक : यानंतर चोर जेव्हा सैफचा घाकटा मुलगा जेहच्या रुमकडे जातो, तेव्हा सैफ या चोरला पकडण्याचा प्रयत्न करतो. याशिवाय या चोराचा हातात चाकू आणि ब्लेड असल्याच देखील सांगण्यात येत आहे. सैफवर सलग सहा वेळा चाकूनं हल्ला केला गेला. यानंतर तो चोर तिथून पळून गेला होता. तसेच सैफला तातडीनं त्याचा मोठा मुलगा इब्राहिम अली खाननं लीलावती रुग्णालयात दाखल केलं होतं. यानंतर त्याच्यावर त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आता सैफला आयसीयूमधून स्पेशल वार्डमध्ये ठेवण्यात आलं आहे.
हेही वाचा :