नवी दिल्ली Major Dhyan Chand Khel Ratna Award : राष्ट्रपती भवनात आज 17 जानेवारी रोजी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा पार पडला, जिथं भारतातील काही प्रमुख खेळाडूंना सन्मानित करण्यात आलं. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डबल ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकर आणि बुद्धिबळ विश्वविजेता डी. गुकेश यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान केला. या दोन्ही खेळाडूंना टाळ्यांच्या कडकडाटात हा सन्मान प्रदान करण्यात आला, जे त्यांच्या कठोर परिश्रमाचं प्रतिबिंब आहे. मनू भाकरनं ऑलिम्पिकमध्ये देशाचं नाव उंचावलं आहे, तर डी गुकेशनं अलिकडेच बुद्धिबळ अजिंक्यपद जिंकलं आहे.
🏆#NationalSportsAwards🏆
— PIB India (@PIB_India) January 17, 2025
Double medalist at the #ParisOlympics @realmanubhaker receives Major Dhyan Chand Khel Ratna Award 2024 from President Droupadi Murmu @rashtrapatibhvn @YASMinistry #NationalSportsAwards2024 pic.twitter.com/CQkXIgYlVr
हरमनप्रीतचाही सन्मान : याशिवाय, भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग यालाही देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मानानं सन्मानित करण्यात आलं. हरमनप्रीत सिंग टोकियो आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचा भाग होता आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्येही त्यानं संघाचं नेतृत्व केलं होतं. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकीनं मोठं यश मिळवलं.
President Droupadi Murmu confers Arjuna Award, 2024 on Shri Swapnil Suresh Kusale in recognition of his outstanding achievements in Shooting. His achievements are:
— President of India (@rashtrapatibhvn) January 17, 2025
• Bronze medal in the Olympic Games (Men’s 50 meter Rifle 3 Positions) held in Paris, France in 2024.
•… pic.twitter.com/RGdG5gb94L
President Droupadi Murmu confers Arjuna Award, 2024 on Shri Sachin Sarjerao Khilari in recognition of his outstanding achievements in Para-Athletics. His achievements are:
— President of India (@rashtrapatibhvn) January 17, 2025
• Silver medal in Paralympic Games (Men’s Shot Put F46) held in Paris, France in 2024.
• Gold medal in… pic.twitter.com/t7MuqeJOLx
पॅरा खेळाडूंनाही मिळाला पुरस्कार : याच समारंभात पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता उंच उडीपटू प्रवीण कुमार यालाही मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आला. प्रवीण कुमारनं टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक आणि पॅरिस ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकलं, जे त्याच्या समर्पणाचं आणि कठोर परिश्रमाचं प्रतीक आहे. त्याचं आयुष्य संघर्षांनी भरलेलं आहे, विशेषतः जन्माशी संबंधित शारीरिक विकार असूनही त्यानं मिळवलेलं यश खूप प्रेरणादायी आहे.
🏆#NationalSportsAwards🏆
— PIB India (@PIB_India) January 17, 2025
President Droupadi Murmu confers Major Dhyan Chand Khel Ratna Award 2024 to Para-Athlete Praveen Kumar@rashtrapatibhvn @YASMinistry #NationalSportsAwards2024 pic.twitter.com/ZE6wWAQ97H
32 खेळाडूंना अर्जुन अवार्ड : यावेळी 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यापैकी 17 खेळाडू पॅरा खेळाडू होते. अर्जुन पुरस्कार विजेत्यांमध्ये पॅरिस ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता कुस्तीगीर अमन सेहरावत, मराठमोळा नेमबाज स्वप्नील कुसाळे, सांगलीचा सचिन खिल्लारी, सरबजोत सिंग आणि पुरुष हॉकी संघातील सदस्य जर्मनप्रीत सिंग, सुखजीत सिंग, संजय आणि अभिषेक यांचा समावेश होता. या खेळाडूंच्या यशावरुन हे सिद्ध होतं की भारतीय क्रीडा जगतात सतत सुधारणा करण्याच्या दिशेनं पावलं उचलली जात आहेत.
🏆#NationalSportsAwards🏆
— PIB India (@PIB_India) January 17, 2025
Men’s Hockey Team Captain Harmanpreet Singh (@13harmanpreet) receives the Major Dhyan Chand Khel Ratna Award 2024 from President Droupadi Murmu at Rashtrapati Bhavan@rashtrapatibhvn @YASMinistry #NationalSportsAwards2024 pic.twitter.com/5j4X13ffE2
हेही वाचा :