पुणे- पुणे-नाशिक महामार्गावर टेम्पोनं मिनी व्हॅनला धडक ( Pune accident news ) दिली. ही मिनी व्हॅन उभ्या असलेल्या बसवर जाऊन आदळल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातात किमान नऊ जणांचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. हा अपघात सकाळी १० वाजण्याच्या सुमारास नारायणगावजवळ झाला.
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या माहितीनुसार नारायणगावकडे जाणाऱ्या मिनीव्हॅनला टेम्पोनं पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यानंतर मिनीव्हॅन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बसवर जाऊन आदळली. या भीषण अपघातात मिनी व्हॅनमधील सर्वांचा, नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतात चार महिला, चार पुरुष आणि एका बाळाचा जागीच मृत्यू झाला आहे. इतर तिघे जखमी आहेत. नाशिकहुन पुण्याच्या दिशेला येताना हा अपघात झाला आहे. जखमी लोकांना तात्काळ उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आलं आहे.
पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळ झालेल्या भीषण अपघातात 9 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 17, 2025
जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो.
मृतांच्या…
मृताच्या वारसांना ५ लाखांची मदत जाहीर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृताच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. त्यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटले, " पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळ झालेल्या भीषण अपघातात 9 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो. मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्यात येईल. जखमींच्या उपचाराची योग्य काळजी घ्या, असे मी पुणे पोलिस अधीक्षक यांना सांगितलं आहे."
हेही वाचा-