ETV Bharat / state

जिल्ह्यात पाच जण कोरोना मुक्त; 127 जणांचा अहवाल निगेटिव्ह, तर 83 जण विलगीकरणात

साताऱ्यात एका दिवसात पाचजण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आज घरी सोडण्यात आले. १२७ जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले असून ८३ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले.

Krantisinha Nana Patil General Hospital
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय
author img

By

Published : May 17, 2020, 2:47 PM IST

सातारा - क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 3 तर कराडच्या सह्याद्री रुग्णालयातील 2 असे एकूण 5 जण बरे झाले आहेत. त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आज घरी सोडण्यात आले. यामध्ये एका आरोग्य कर्मचारी महिलेचा समावेश आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी याबाबत माहिती दिली.

जिल्ह्यात पाच जण कोरोना मुक्त

127 जणांचे अहवाल निगेटिव्ह -

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 52, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 64 अशा एकूण 116 जणांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने कळवले आहे. कराडच्या कृष्णा रुग्णालयामध्ये तपासणी करण्यात आलेल्या 11 कोरोना संशयितांचेही अहवाल निगेटिव्ह आहेत.

83 जण विलगीकरण कक्षात -

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय 8, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात 75 अशा एकूण 83 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.