ETV Bharat / state

संचारबंदीचा भंग करत क्रिकेट खेळणाऱ्या सहा मुलांवर गुन्हा दाखल - संचारबंदीत क्रिकेट खेळणाऱ्यांवर गुन्हा

साताऱ्यातील मसूर गावातील उद्यानात क्रिकेट खेळणाऱ्या मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. संचारबंदीचे उल्लंघन केल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

फाईल फोटो
फाईल फोटो
author img

By

Published : Mar 30, 2020, 10:58 AM IST

सातारा - संचारबंदीचा भंग केल्याप्रकरणी उद्यानात क्रिकेट खेळणाऱ्या सहा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मास्कचा वापर न करता आणि लोकांना धोका निर्माण होईल, अशा रितीने हे सर्वजण मसूर गावात क्रिकेट खेळत होते. त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली.

प्रथमेश उमेश बाचल, सलमान मनसुर हकीम, साहिल धस, केतन बर्गे, तन्मय नंदकुमार बर्गे, ओंकार बर्गे (रा. मसूर, ता. कराड), अशी गुन्हा दाखल झालेल्या युवकांची नावे आहेत. मसूर गावातील जेठाभाई उद्यानात सहा युवक क्रिकेट खेळत होते. ही बाब लक्षात आल्यानंतर कॉन्स्टेबल अभिजीत पाटील यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. संचारबंदीमध्ये कोणीही बाहेर पडू नये, असे आदेश आहेत. तसेच कोरोनाबाबत दक्षता बाळगण्याच्या सूचना वारंवार दिल्या जात आहेत. तरीही या मुलांनी संचारबंदीचे उल्लंघन केले. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.