ETV Bharat / state

कुबेरांचे पुस्तक पुरंदरेंचा इंग्रजी अवतार; श्रीमंत कोकाटेंनी केली बंदी घालण्याची मागणी

author img

By

Published : Jun 16, 2021, 7:31 AM IST

कुबेरांची मांडणी छत्रपती शिवराय, राजमाता जिजाऊ यांची बदनामी करणारी आहे. शिवरायांच्या कर्तृत्वाचे श्रेय हिरावून सनातनी व्यवस्थेला देणे हा त्यांचा उद्देश आहे. संशोधनाचे कोणतेही नियम न पाळता लेखणी उचलून खरडपट्टी करण्याची त्यांची पद्धत आहे. छत्रपती संभाजीराजे, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती शाहू यांच्या बाबतही कुबेर यांनी आक्षेपार्ह मांडणी करून अनैतिहासिक मजकूर प्रसिद्ध केला आहे.

श्रीमंत कोकाटेंनी केली बंदी घालण्याची मागणी

सातारा - संपादक गिरीश कुबेर यांचे 'रेनिसान्स स्टेट' हे पुस्तक वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. कुबेरांचे हे पुस्तक म्हणजे पुरंदरेंचा इंग्रजी अवतार असल्याची टीका इतिहास अभ्यासक आणि वक्ते डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी केली आहे. तसेच राज्यशासनाने या पुस्तकांवर तत्काळ बंदी घालून कठोर कारवाई करावी, अशी मागणी देखील कोकोटे यांनी सातारा येथील आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.

कुबेरांचे पुस्तक पुरंदरेंचा इंग्रजी अवतार

हा तर उद्धटपणा आणि विकृती-

ते पुढे म्हणाले, दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवराय यांचे गुरू नव्हते हे शासन नियुक्त वसंत पुरके समितीने सिद्ध केले आहे. हा वैचारिक वाद महाराष्ट्रात सात वर्षे सुरू होता. याची गिरीश कुबेरांना अजिबात कल्पना नव्हती असे होत नाही. संशोधनाअंती राज्य सरकारने दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवून त्यांच्या नावाचा क्रीडा पुरस्कार रद्द केला. तरीसुध्दा 'रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र' या पुस्तकात कुबेर ओढून तानून कोंडदेवांचा उल्लेख शिवराय-जिजाऊंशी जोडतात. हा कुबेरांचा उद्धटपणा आणि विकृती आहे.

पुस्तक पुरंदरेंचा इंग्रजी अवतार-

कुबेरांची मांडणी छत्रपती शिवराय, राजमाता जिजाऊ यांची बदनामी करणारी आहे. शिवरायांच्या कर्तृत्वाचे श्रेय हिरावून सनातनी व्यवस्थेला देणे हा त्यांचा उद्देश आहे. संशोधनाचे कोणतेही नियम न पाळता लेखणी उचलून खरडपट्टी करण्याची त्यांची पद्धत आहे. छत्रपती संभाजीराजे, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती शाहू यांच्या बाबतही कुबेर यांनी आक्षेपार्ह मांडणी करून अनैतिहासिक मजकूर प्रसिद्ध केला आहे. त्यांची ही मांडणी संघी विकृतीने भरली असल्याची टीका कोकाटे यांनी केली.

सुसंस्कृत असाल तर पुस्तक मागे घ्यावे-

जे कुबेर संत रामदास, टिळक, सावरकर, हेडगेवार, गोळवलकर यांचे विस्ताराने कौतुक करतात. ते चक्रधर बसवेश्वर, संत तुकाराम महाराज महर्षी वि .रा. शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, केशवराव भोसले, अण्णाभाऊ साठे यांचा साधा उल्लेखपण करत नाहीत. महाराष्ट्राच्या पुनर्जागरामध्ये यांचा काही वाटा नाही, असे कुबेरांना वाटते काय? हे पुस्तक सनातनी विचारांचे चोपडे जातीयवादाने भरलेले आहे. कुबेरांमध्ये सुसंस्कृतपणा शिल्लक असेल तर त्यांनी हे पुस्तक स्वतःहून मागे घ्यावे, असं आवाहनही श्रीमंत कोकाटे यांनी केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.