ETV Bharat / state

महामार्गाची दूरवस्था, दुरुस्तीचे काम हाती घेऊन पूर्ण होईपर्यंत टोल वसुली बंद करा- आमदार शिवेंद्रराजे - Satara MLA Shivendra Raje Bhosale

सातारा ते पुणे एन. एच. ४ या महामार्गाचे पावसामुळे नुकसान झाले असून ठिकठिकाणी छोटेमोठे खड्डे पडले आहेत. महामार्गाची अक्षरशः चाळण झाली असून चारचाकी वाहनांचे टायर फुटून अपघात होण्याचे प्रसंग घडत आहेत. खड्ड्यात आदळून दुचाकीस्वार पडत आहेत. खड्ड्यांमुळे अपघात होत असून वाहन चालक आणि प्रवाशांचा जीव टांगणीला लागत आहे.

आमदार शिवेंद्रराजे
आमदार शिवेंद्रराजे
author img

By

Published : Aug 6, 2021, 10:37 AM IST

सातारा - गेल्या महिन्यात पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्याप्रमाणेच सातारा जिल्ह्यातील सातारा-पुणे महामार्गावर खड्डे पडून रस्त्यांची चाळण झाली आहे. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची भीती निर्माण झाली. त्यामुळे रस्त्यावर वाहन चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे, तसेच या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने संभाव्य धोके लक्षात घेऊन सातारा ते पुणे महामार्गाची तातडीने दुरुस्ती करावी, तसेच जोपर्यंत दुरुस्ती होत नाही तोपर्यंत टोल वसुली बंद करावी, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.

आमदार शिवेंद्रराजे भोसले

जीविताला धोका-

याबाबत शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना भेटून मागणीचे निवेदन दिले. सातारा ते पुणे एन. एच. ४ या महामार्गाचे पावसामुळे नुकसान झाले असून ठिकठिकाणी छोटेमोठे खड्डे पडले आहेत. महामार्गाची अक्षरशः चाळण झाली असून चारचाकी वाहनांचे टायर फुटून अपघात होण्याचे प्रसंग घडत आहेत. खड्ड्यात आदळून दुचाकीस्वार पडत आहेत. खड्ड्यांमुळे अपघात होत असून वाहन चालक आणि प्रवाशांचा जीव टांगणीला लागत आहे.

महामार्ग असुरक्षीत-

प्रवासी जायबंदी होणे अथवा प्राणाला मुकण्याची शक्यता आहे. या महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे महामार्गाची त्वरित दुरुस्ती करावी आणि जोपर्यंत दुरुस्ती होत नाही तोपर्यंत टोल वसुली बंद करावी, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. रस्ता दुरुस्ती संदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी सिंह यांनी दिले.


ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.