सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांचा काही विकृत प्रवृत्तींकडून वारंवार अवमान केला जात आहे. अशा विकृत्त प्रवृत्ती नेस्तनाबूत करून महान राजाचा स्वाभिमान आणि सन्मान जपण्यासाठी सर्वांनी एकत्र येवून 'शिवसन्मानाचा निर्धार' करण्याची हाक छत्रपतींचे थेट वंशज (descendant of Chhatrapati Shivaji Maharaj) तथा खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanaraje Bhosale) यांनी दिली आहे.
छत्रपतींचा इतिहास प्रेरणादायी : छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड भारताची अस्मिता आहेत. त्यांच्या शौर्याचा इतिहास संपूर्ण जगाला प्रेरणादायी असून नवी पिढी हाच इतिहास पुढे नेत आहे. त्यांचा अवमान करणाऱ्या विकृत्ती नेस्तनाबूत करण्यासाठी सोमवारी (दि. २८) रेसिडेन्सी क्लब, पुणे येथे दुपारी १२ वाजता 'शिवसन्मानाचा निर्धार' करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन उदयनराजेंनी केले (Determination Of Shiv Sanmana) आहे.
रयतेच्या सहभागाने स्वराज्याची स्थापना : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना रयतेचा सहभाग महत्वाचा मानला. त्यातूनच खऱ्या अर्थाने लोकशाहीचा पाया रचला गेला. तसेच सर्वधर्मसमभावातून रयतेला सन्मानाची वागणूक दिली. प्रत्येक जाती धर्माचा आदर, सन्मान केला. त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा काही विकृत प्रवृत्तींकडून वारंवार अवमान केला जात असल्याने उदयनराजे भोसले यांनी तीव्र संताप व्यक्त केला (determination will be made on Monday) आहे.
कोश्यारी, त्रिवेदींच्या हकालपट्टीची मागणी : छत्रपती शिवाजी महाराजांबददल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांना तातडीने पदावरुन दूर करा, अशी मागणी उदयनराजेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदनाद्वारे केली आहे. यासंदर्भात त्यांनी दि. २८ पर्यंतचा अल्टिमेटमही दिला आहे. त्यामुळे उदयनराजे सोमवारी काय भूमिका घेतात, याची सर्वांना उत्सुकता (Shiv Sanmana) आहे.