ETV Bharat / state

'आमदार, कार्यकर्त्यांची चलबिचल होऊ नये, म्हणून 'असे' गाजर दाखवावे लागते' - अजित पवार भाजप टीका

कार्यकर्ते बरोबर राहावेत, आपल्या आमदारांमध्ये चलबिचल होऊ नये, म्हणून सरकार पडणार, असे गाजर दाखवावे लागते, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजपला लगावला. सरकार पडणार असल्याची वक्तव्ये भाजपकडून सातत्याने केली जात आहेत. त्यासंदर्भातील प्रश्नावर कराड येथे बोलताना अजितदादांनी प्रतिक्रिया दिली.

अजित पवार
अजित पवार
author img

By

Published : Nov 25, 2020, 7:45 PM IST

कराड (सातारा) - कार्यकर्ते बरोबर राहावेत, आपल्या आमदारांमध्ये चलबिचल होऊ नये, म्हणून सरकार पडणार, असे गाजर दाखवावे लागते, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजपला लगावला. सरकार पडणार असल्याची वक्तव्ये भाजपकडून सातत्याने केली जात आहेत. त्यासंदर्भातील प्रश्नावर कराड येथे बोलताना अजितदादांनी प्रतिक्रिया दिली.

कराड
तोपर्यंत सरकारला काही होणार नाही...

उध्दव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी मिळून महाविकास आघाडी केली आहे. त्यांचे आशीर्वाद महाविकास आघाडीच्या पाठिशी आहेत, तोपर्यंत सरकारला काहीही होणार नाही, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

59 हजार कोटींची वीजबिल थकबाकी

सर्व प्रकारची मिळून 59 हजार कोटींची वीजबिल थकबाकी असल्याची माहिती अजित पवारांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले की, 2014 पर्यंत आम्ही सत्तेवर होतो. त्यानंतर भाजप सरकार सत्तेवर आले. आमच्या सत्तेच्या काळात किती थकबाकी होती आणि नंतर किती वाढली, ते पहा. कारण, एखादी संस्था चालविताना त्या संस्थेला अर्थिक शिस्त असावी लागते. अडचणी आल्या, तरी त्यातून मार्गही काढावा लागतो. कोरोना संकटापूर्वी राज्याची अर्थिक परिस्थिती बर्‍यापैकी होती. पण, टाळेबंदीमुळे केंद्राकडून कर रूपातील परताव्याचे पैसे येणे अजून बाकी असल्याचेही त्यांनी सांगितले.

29 हजार कोटींचा जीएसटी परतावा बाकी

कर रूपातील जीएसटी परताव्याचे 29 हजार कोटी रूपये केंद्र सरकारकडून येणे अजून बाकी असल्याचे सांगून अजित पवार म्हणाले, वन नेशन, वन टॅक्स हा जीएसटीचा नवीन कायदा लागू करताना केंद्र सरकारने जे शब्द दिले होते. त्याचीही अंमलबजावणी झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारकडून समान वागणूक मिळावी

नैसर्गिक संकटातील मदतीमध्ये केंद्र सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. केंद्रात मनमोहन सिंग यांचे सरकार असताना सर्व राज्यांना समान वागणूक दिली जात होती, याचीही आठवण त्यांनी करून दिली.

हेही वाचा - येत्या दोन-तीन महिन्यांत महाराष्ट्रात भाजपाचे सरकार येणार, रावसाहेब दानवेंचा दावा

हेही वाचा - रावसाहेब दानवेंच्यातील 'ज्योतिषी' प्रतिभा मला आता समजली - शरद पवार

हेही वाचा - पर्यायी सरकार देण्यास आम्ही सक्षम - देवेंद्र फडणवीस

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.