सातारा - महाबळेश्वरमधील लॉडविक पॉईंटच्या खोल दरीच्या टोकावर कड्यामध्ये एका अज्ञाताचा व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी अवघ्या 12 तासांत मृत व्यक्तीची ओळख पटली असून प्रशांत भालचंद्र वाडेकर (वय 56, रा. श्रेयस सोसायटी बंगला, शंकरशेठ रोड, पुणे), असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - पालीच्या खंडोबाची आजपासून यात्रा; महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटकमधील भाविक दाखल
लॉडविक पॉइंट येथे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना फोटो काढताना दरीच्या टोकावर कड्यामध्ये मृतदेह आढळून आला होता. लॉडविक पॉइंट ते हत्तीचा माथा परिसरात असलेल्या खोल दरीच्या अगदी टोकावरील कड्यामधील मृतदेह बाहेर काढण्यात आला. कपड्यांचे वर्णन आणि चेहरा दिसत असल्याने फोटोसह माहिती पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलिसांच्या विविध ग्रुपवर दिली होती. ही माहिती वालचंदनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी पाहिल्यावर फोटो व माहितीच्या आधारे अलंकार पोलीस ठाणे, पुणे यांच्याकडे प्रशांत भालचंद्र वाडेकर (वय 56) हे 27 डिसेंबरला बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
हेही वाचा - पुणे व्यापारी हत्या प्रकरण : साताऱ्यातील आरोपीला अटक
त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क करून त्यानंतर त्यांची दोन मुले आणि नातेवाईक महाबळेश्वरमध्ये दाखल झाले. नातेवाईकांची खात्री पटल्यानंतर वाडेकर यांचा मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला.